रत्नागिरी (आरकेजी): जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज रत्नागिरीत सागरी किनारे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. केंद्रीय पर्यावरण विभाग, वन मंत्रालय, समाजिक वनिकरण यांनी या स्वच्छता मोहीमेत सहभाग नोंदवला.
सागरी किनारा स्वच्छता व प्लास्टिक कचर्याच्या निर्मुलनासाठी पांढरा समुद्र येथे स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहीमेत विविध कंपन्यांनी, आयटीआयचे मुलांनी सक्रिय सभग नोंदवून स्वच्छता मोहिम यशस्वी केली. सुमारे दीड ते दोन टन कचरा गोळा केला. केंद्र शासनाने निवडलेल्या किनार्यांमध्ये गणपतीपुळे आणि मिर्या किनार्याचा समावेश होता. समाजिक वनीकरण आणि वन विभागाकडून पंधरा मे पासून ही स्वच्छता मोहिम सुरू आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालयाने विद्यार्थी, निसर्ग प्रेमी, विविध कंपन्या, सेवाभावी संस्था सभागी झाल्या. महाविद्यालये, समाजिक संस्था आदी त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज पांढरा समुद्र किनार्यावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. मोठ्या प्रमाणात समुद्र किनार्यावर साचलेले प्लास्टिक, बाटल्या, कचरा, थर्माकॅल, ओला कचरा आदी गोळा करून किनारा स्वच्छ करण्यात आला.