मुंबई, (शांताराम गुडेकर) : कोकण राज्य व्हावे, यासाठी “स्वतंत्र कोकण कृती समिती”च्या माध्यमातून चळवळ सुरू करण्यात आली आहे. चळवळीची आगामी दिशा ठरविण्यासाठी मुंबईत शनिवारी २५ नोव्हेंबर रोजी सभा घेण्यात येणार आहे. दादर पूर्वेतील सुरेंद्र गावस्कर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय येथे संध्याकाळी ५ ते रात्री ९ यावेळेत कोकणातील मंडळींनी उपस्थित राहावे असे आवाहन स्वतंत्र कोकण कृती समितीचे निमंत्रक दिलीप लाड यांनी केले आहे.
कोकणातील पालघर, महामुंबई, ठाणे,रायगड , रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र अशी बलस्थाने आहेत. गोवा, केरळच्या तुलनेत कोकण अजूनही रस्ते, औद्योगिक, शेती, शैक्षणिक वा वैद्यकीय सेवांसाठी मागास अवस्थेत आहे. त्यानुसार भविष्यातील कोकणच्या विकासाची वाटचाल करण्यासाठी ‘ स्वतंत्र कोकण कृती समिती’ ची स्थापना करण्यात आली आहे. समितीच्या माध्यमातून स्वतंत्र कोकण राज्याबाबत ची भूमिका ठरवणे, कोकण विकासाचे विविध मुद्दे ठरवून त्यावर सकारात्मक काम करणे अशी ढोबळ उद्दिष्टे ठरवण्यात आलेली आहेत.
सभेला स्वतंत्र कोकण” चळवळ चालवणारे प्रा. महेंद्र नाटेकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. स्वतंत्र कोकण समितीच्या कामकाजात सक्रीय सहभाग घेण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक प्रा. नाटेकर ( मोबाईल -+91 94223 73592 / +91 77450 09917 )आणि स्वतंत्र कोकण कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष दिलीप लाड ( मोबाईल – +91 99691 92969/ +91 77388 21459) यांना संपर्क करावा असे आवाहन स्वतंत्र समिती तर्फे करण्यात आले आहे.