नवी दिल्ली : भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री आणी ज्येष्ठ भाजप नेत्या सुषमा स्वराज यांचे आज रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. मृत्यूसमयी त्या ६७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.
सुषमा स्वराज यांना अचानक छातीत दुखू लागले. यानंतर त्यांना ताबडतोब दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी उपचार सुरू केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
सुषमा स्वराज यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९५२ ला झाला. त्या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी वकील आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्या होत्या. त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात मंत्रीपदांची जबाबदारी सांभाळली. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हंणून त्यांची कारकिर्द नेहमीच लक्षात राहिली.