
मुंबई : पेटीएम मनी या म्यूचुअल फंड गुंतवणुकीसाठीच्या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन मंचाने सुरेश वासुदेवन यांना आपले चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर (सीटीओ) म्हणून नियुक्त केल्याचे जाहीर केले. सुरेश वासुदेवन पेटीएम मनीचा एकंदर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विभागाचा कारभार सांभाळतील.
सुरेश वासुदेवन यांच्या गाठीशी पेमेंट, ई-कॉमर्स आणि फिनटेक क्षेत्रात विविध स्टार्ट-अप्स आणि एंटरप्राइज उत्पादन कंपन्यांत उत्पादन विकास विभागाचा २० वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी अॅमेझॉनमध्ये अॅलेक्सा स्किल्स सर्टिफिकेशन मंचासाठी अभियांत्रिकी प्रमुख म्हणून काम केलेले आहे. तसेच त्यांनी युनिसेल टेक्नॉलॉजीस मध्ये अभियांत्रिकी उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे व सिफी आणि एमचेकमध्ये नेतृत्व केलेले आहे. पेटीएम मनीमध्ये दाखल होण्यापूर्वी पेटीएम मॉलमध्येही त्यांनी अभियांत्रिकी उपाध्यक्ष म्हणून काही काळ काम केले आहे.
पेटीएम मनीचे पूर्ण वेळ संचालक प्रवीण जाधव म्हणाले, “विविध टेक्नॉलॉजी आणि उद्योगांतील सुरेश वासुदेवन यांच्या प्रगाढ अनुभवाचा आमच्या गुंतवणूक मंचाच्या उभारणीत आणि विकासात खूप फायदा होईल. सुरेश पेटीएम मनीसाठी डेटा सायन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षमता तयार करण्याबाबत देखील काम करतील कारण आमच्या यूझर्ससाठी गुंतवणुकीचा सल्ला आणि निर्णय प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आमचा मंच ऑटोमॅटिक करण्याकडे आणि रोबो-अॅडव्हायझरी-आधारित गुंतवणूक उत्पादने तयार करण्याकडे आमचे लक्ष केन्द्रित आहे.”
नवीन नियुक्तीबद्दल बोलताना सुरेश वासुदेवन म्हणाले, “एक वापरकर्ता म्हणून मी खूप सुरुवातीलाच पेटीएम मनीचा स्वीकार केला होता. ज्या फोकसने आणि उत्कटतेने या अभियांत्रिकी टीमने हे उत्पादन बनवले आहे आणि लॉन्चनंतर अगदी काही महिन्यातच ज्याप्रकारे त्यास अव्वल स्थानी पोहोचवले आहे, त्याचे मला कौतुक वाटत असे. लक्षावधी भारतीयांसाठी एक जागतिक दर्जाचे गुंतवणूक-उत्पादन तयार करण्याच्या वाटचालीत या टीमचे नेतृत्व करताना मला अतिशय आनंद होत आहे















