मुंबई : मुंबई महापालिकेचे माजी धडाकेबाज अधिकारी सुरेश रासम यांची म्युनिसिपल मजदूर युनियनच्या मुंबई युनिटच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. परळ येथे युनियनचे अध्यक्ष ऍड. घनश्याम गायकवाड, सफाई कामगार परिवर्तन संघाचे अध्यक्ष रमेश हरळकर, जनता दल मुंबई चे महासचिव ऍड. प्रशांत गायकवाड यावेळी उपस्थित होते.
सुरेश रासम हे मुंबई पालिकेचे डॅशिंग अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी पालिकेत कनिष्ठ कामगारांसाठी कार्य केले होते. त्यांच्या कामगारांप्रती असलेली जाणीव पाहता त्यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.