मुंबई (शांत्ताराम गुडेकर) : मुंबईत रुग्णांना अद्ययावत तंत्रज्ञान व वैद्यकीय सेवा सुविधा पुरविण्यासाठी पूर्व उपनगरातील मुलुंड येथे नव्या सुपर स्पॅशिअॅलिटी हॉस्पिटलची भर पडली आहे. वाजवी दरातील, रुग्णाभिमुख आरोग्य संस्था, जिथे रुग्णांना समाधानकारक वैद्यकीय सेवा प्राप्त होईल, अशी माहिती स्त्रीरोगतज्ज्ञ आणि ऑब्स्ट्रिशिअन डॉ. श्रद्धा उपासनी आणि प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ आणि गुडघे प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ. तेजस उपासनी यांनी दिली.
४५ वर्षांचा वारसा असलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञ आणि ऑब्स्ट्रिशिअन डॉ. श्रद्धा उपासनी आणि प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ आणि गुडघे प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ. तेजस उपासनी यांनी ६० बेड असलेले यूएसएसएच हे सुपर स्पेशिअॅलिटी हॉस्पिटल मुलुंडमध्ये सुरू झाले आहे. या हॉस्पिटलचे वैशिष्ट्य म्हणजे रुममधील रुम ही संकल्पना. या संकल्पनेमुळे हवेचा प्रवाह कायम राखला जातो. तर दरवाजा उघड-बंद केल्यानेही त्यावर परिणाम होत नाही. ही काचेची खोली असून ही केवळ स्क्रब टीमसाठीच असेल्यामुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्यावर प्रतिबंध घातला जातो. अस्थिविकारतज्ज्ञ आणि गुडघे प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. तेजस उपासनी म्हणतात, “मुंबईतील रहिवाशांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. मुंबईच्या लोकसंख्येची बदलती धाटणी पाहता आरोग्यसेवांची गरजही त्याच प्रमाणात वाढलेली आहे. जीवनशैलीशी निगडीत विकार उद्भवण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे आरोग्य तपासणी शिबिरे, आरोग्यसेवा प्रशिक्षण उपक्रम राबविण्यावर प्रथम भर देण्यात येणार आहे.
नजीकच्या भविष्यकाळात हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल १०० खाटांचे होणार आहे. या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक अतिदक्षता विभाग, चार ऑपरेशन थिएटर्स, तातडीचे वैद्यकीय सेवा केंद्र, तातडीची हृदयचिकित्सा यंत्रणा असेली कॅथ लॅब आणि २४ तास औषधे आणि तातडीच्या सेवा उपलब्ध असतील. या ठिकाणी स्त्रीरोग, अस्थिविकार, न्यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी, हृदयविकार इत्यादी शाखांमध्ये आरोग्यसेवा पुरविण्यात येणार आहेत.