मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर )
प्रेरणा फाऊंडेशन बदलापूर महाराष्ट्र,अंतर्गत प्रेरणा फाऊंडेशन ला २३ मार्च २०२३ ला ५ वर्ष पूर्ण झाली.या प्रेरणा फाऊंडेशनचा ५ व्या वर्धापनदिनाचे निमित्त साधून थोर समाजासाठी झटणाऱ्या १० संस्थांचा “गोरगरिबांचा आधार स्तंभ पुरस्कार-२०२३” देऊन सन्मानित करण्यात आले.यात धारावीतील सुनिर्मल फाउंडेशनला राज्यस्तरीय सर्वांत्कृष्ट गोरगरिबांचा आधारस्तंभ पुरस्कारराने मान्यवर व्यक्तींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी मंच्यावर प्रेरणा फाऊंडेशन संस्थापिका/अध्यक्षा दिप्ती उर्फ प्रेरणा (गांवकर) कुलकर्णी उपस्थित होत्या.यापूर्वी सुद्धा दै.मुंबई मित्र,दै.वृत्त मित्र वास्ट मिडीया व अभिजित राणे युथ फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात सुनिर्मल फॉउंडेशन धारावी या संस्थेला सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल”मुंबई अचिवर्स एक्सलन्स अवाॅर्ड २०२३ ने सन्मानित करण्यात आले होते.तसेच बदलापूर येथील जनजागृती सेवा समितीने अभिनेत्री सिद्धी कामत यांच्या हस्ते राज्यस्तरीय सर्वांत्कृष्ठ संस्था पुरस्कार 2022 ने सुनिर्मल फाउंडेशनला सन्मानित करण्यात आले होते.
सुनिर्मल फाउंडेशन शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत असून विवध संस्था आणि संघटना त्याची योग्य दखल घेत आहेत. यामुळे सुनिर्मल फाउंडेशनला आणखी जोमाने काम करण्याचे बळ मिळत आहे.