नवी मुंबई : सर्वांना माहीतच आहे की, कोरोना महामारी आणि रशिया युक्रेन संघर्षामुळे भारतासह जगभरातील उद्योगधंदे त्रस्त झाले आहेत. सुल्झर पंप्स् इंडिया प्रा. लि (सुल्झर ) ही जागतिक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. सुल्झर कंपनी हि उच्च तंत्रज्ञानाचा समावेश असलेले API पंप बनवते. इतर अनेक कंपन्यांनी ही API पंपांच्या निर्मितीमध्ये प्रवेश केला आहे, ज्यामुळे स्पर्धा वाढली आहे. अशा परिस्थितीत पगारवाढीचा करार करणे म्हणजे मोठे अग्निदिव्यच होते.
अशा कठीण परिस्थितीत कामगारांनी एकजुटीने सन २०२० रोजी एक क्रांती घडवून आणली व युनियन आपल्या ताब्यात घेतली . या वर्षी ९ ऑगस्ट या क्रांती दिनाचे औचित्य साधून एक नवीन क्रांती घडवून आणण्याचे कामगारांनी ठरविले आणि सुल्झर पंप्स इंडिया एम्प्लॉईस युनियन (सेऊ) चे अधिकृत अध्यक्ष श्री. रुपेश पवार आणि जनरल सेक्रेटरी श्री. संजय आंब्रे यांच्या नेतृत्वाखालील सेऊच्या युनियन कमिटीने कंपनीशी यशस्वी वाटाघाटी करून ९ ऑगस्ट या दिवशीच हा करार संपन्न केला. या वेतन वाढीच्या त्रैवार्षिक कराराची रक्कम सरासरी रुपये २८,००० आहे. हा त्रैवार्षिक भव्यदिव्य करार करून सेऊच्या युनियन कमिटीने कामगारांना गणपतीच्या आगमना पुर्वीच मोठी आनंदाची भेट दिली.
या वेतनवाढीच्या कराराच्या तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला कामगारांचे कमाल वार्षिक वेतन आता रु. २२,८६,७४७/- होईल तसेच दुसरे कमाल वार्षिक वेतन रु. २२,३५,६९४ /- होईल.
कामगारांनी या कराराचा आनंद साजरा करत ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळत युनियनचे अध्यक्ष श्री. रुपेश पवार व त्यांच्या कमिटी सभासदांना खांद्यावर घेऊन सभा स्थळापर्यंत मिरवणूक काढली. या करारावेळी कंपनी न्यवस्थापनेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. सुजल शहा, एच.आर. आणि अॅडमिनिस्ट्रेशनचे वाईस प्रेसिडेंट श्री. गुरूलालसिंग उप्पल , आर. ई . एस. व पी . एस चे प्रमुख श्री उन्नधा राजा , फायनान्स व कॉन्ट्रॉलिंग चे वाईस प्रेसिडेंट श्री . लक्ष्मीनारायण तोषनीवाल , उत्पादन विभागाचे जनरल मॅनेजर श्री .जितेंद्र सावंत , प्रोक्यूरमेन्ट विभागाचे वाईस प्रेसिडेंट श्री. शिरीष शाह , क्वालिटी व सेफ्टी विभागाचे प्रमुख श्री. आनंद क्षीरसागर , एच.आर.आय.आर. विभागाचे असिस्टंट जनरल मॅनेजर श्री. अमित सिरोही, लीगल व सी एस विभागाच्या डेप्युटी जनरल मॅनेजर श्रीमती.अलका सिंघ, व सेऊचे अध्यक्ष श्री. रुपेश पवार, जनरल सेक्रेटरी श्री. संजय आंब्रे, उपाध्यक्ष श्री. मयुर उपाध्ये, खजिनदार श्री. माधव सकपाळ, सचिव श्री. किसन भोर, उपसचिव श्री. रणजित म्हात्रे, कमिटी मेंबर श्री. केतन कांगणे, श्री. संजय भारती, श्री. संतोष मांजरेकर उपस्थित होते.