नवीमुंबई: सुल्झर पंप्स इंडिया प्रा. ली. ही एक नावाजलेली बहुराष्ट्रीय कंपनी असून या कंपनीमध्ये सुल्झर पंप्स एम्प्लॉईस युनियन ही अंतर्गत कामगार संघटना कार्यरत आहे. या युनियनचे अध्यक्ष श्री. रुपेश पवार व सरचिटनिस श्री. संजय आंब्रे आहेत. यांच्या कमिटीने गेल्यावर्षी 9 ऑगस्ट 2022 रोजी कामगारांच्या पगारवाढीचा (28000/- रुपये) व बोनसचा त्रैवार्षिक करार केला होता. त्याअनुषंगाने सुल्झरच्या कामगारांना दिवाळीच्या अगोदरच बोनस दिला गेला. 2022 सालाचा या वर्षी दिला गेलेल्या बोनसची रक्कम कमाल 1,20,000/- रुपये आहे व सरासरी बोनस एक लाखाहून अधिक आहे. कोरोनाच्या महासंकटातून सावरत सावरत कंपनी सर्व संकटांना सामोरे जात भक्कम पणे चालू राहिली. युक्रेन आणि रशियन युद्धामुळे कंपनीच्या पंपाच्या मागणीत घट झाली होती आणि होत्या त्या मागण्याही काही रद्द झाल्या होत्या. अशा परिस्थितही कंपनीने कामगारांचा पगार वेळच्या वेळी देऊन बोनसही दिवाळीच्या अगोदर दिला व दिवाळी भेट म्हणून 24 कॅरेटचे सोन्याचे नाणे वाटप केले. कंपनीतल्या प्रत्येक कामागार कर्मचाऱ्याला उच्च दर्जाची 1 किलो ड्रायफ्रुट मिठाई वाटप केली त्यामुळे कामगारांनी दिवाळी जल्लोषात साजरी करून सुल्झर व्यवस्थापनेचे आभार मानले आणि युनियन कमिटीचे अभिनंदन केले.