नवी दिल्ली : भारतीय तटरक्षक दलाची ‘सुजय’ ही गस्ती नौका आज गोव्यात तटरक्षक दलाचे महासंचालक राजेंद्र सिंह यांच्या हस्ते सेवेत दाखल करण्यात आली. किनाऱ्यापासून 105 मीटरपर्यंतच्या गस्तीसाठीच्या 6 नौकांच्या मालिकेतली ही 6वी नौका आहे. अत्याधुनिक साधनांनी ती सज्ज असून, ती स्वदेशी बनावटीची आहे. या नौकेद्वारे मुख्यत: पूर्व समुद्री किनारा आणि ओडिशा व पश्चिम बंगालच्या सागरी राज्यांना सुरक्षा देण्यात येईल.