मालाड, ता.15(वार्ताहर) : पत्रकार दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्यावतीने वनौषधी प्रसार,प्रचार,संवर्धन, लागवड या कार्याबद्दल आर्या प्रहरचे संपादक तथा आर्या वनौषधी संस्थेचे अध्यक्ष सुधीर नामदेव पाटील यांना पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते पर्यावरण संवर्धक पुरस्कार देवून गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमास पनवेलचे तहसिलदार विजय तळेकर, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे ,शिवसेना नेते रामदास शेवाळे ,मनसेचे संजय मिरकुटे ,उद्योजक राजू कोलकर, पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे निलेश सोनावणे, सय्यद अकबर, गणेश कोळी, दीपक महाडिक, मयूर तांबडे, अनिल भोळे, सागर राजे, संजय कदम, विशाल सावंत, केवल महाडिक,रविंद्र गायकवाड, संतोष सुतार,संतोष भगत,प्रवीण मोहोकर,सुनिल काटेकर,सनिप कलोते,राजेंद्र कांबळे,दीपाली पारसकर,गौरव जहागीरदार, लक्ष्मीकांत ठाकूर,गणपत वा रगडा, भरतकुमार कांबळे ॲड. मनोहर सचदेव,आनंद पवार, कैलास खोंडे, किरण बाथम, अनिल राय,असीम शेख, अनिल कुरघोडे,लक्ष्मण ठाकूर, भानुदास बोरीले, शंकर वायदंडे आदी मान्यवरांसह बहुसंख्येने पत्रकार व नागरिक उपस्थित होते.
















