चंद्रपूर : केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे उमेदवार, राज्याचे मंत्री श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार जी यांच्या प्रचारार्थ दुर्गापूर येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित केले.
श्री गडकरीजी म्हणाले, “चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासात सुधीरभाऊंचा सिंहाचा वाटा आहे. राज्याचे वनमंत्री या नात्याने पर्यावरण क्षेत्रातही त्यांनी अमुलाग्र काम केले आहे. वन विकासाच्या कार्यात त्यांच्या रुपाने राज्याने जागतिक विक्रम केला आहे.”
विकासाच्या दृष्टिकोनातून केवळ मतदारसंघातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात त्यांनी काम केले असल्याचे श्री गडकरीजी यांनी सांगितले. विकासाची आस असलेली बल्लारपूरची जनता तळमळीने काम करणाऱ्या सुधीरभाऊंना यावेळेस देखील प्रचंड बहुमताने विजयी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.