रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये शिवसेनेकडून सातत्याने निवडणुका किंवा पोटनिवडणुका लादण्याची मोहीम काढण्यात आली आहे, त्यामुळे नागरपालिकेवर अतिरिक्त खर्च पडत असून हा खर्च शिवसेनेकडून नगरपालिकेच्या फंडामध्ये भरणा करून घ्यावा अशी मागणीने राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा नगर परिषदेतील गटनेते सुदेश मयेकर यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांकडे केली आहे. आज पत्रकार परिषदेत मयेकर यांनी याबाबत माहिती देत शिवसेनेवर जोरदार टीका केली.
शिवसेनेला आता विकास कामांचे महत्व राहिलेले नसून केवळ खुर्ची या निवडणुकांच्या माध्यमातून महत्वाचे मानले जात आसल्याचे मयेकर यांनी यावेळी सांगितले. रत्नागिरी नगर पालिकेची काही दिवसात थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होऊ घातलेली आहे.जनतेमधून थेट निवडून आलेले राहुल पंडित यांच्या नगराध्यक्ष पदाच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेने रत्नागिरी शहरवासीयांवर पोट निवडणूक लादली आहे असा आरोप त्यांनी केला. सध्या नगराध्यक्ष पदाचा कार्यभार प्रभारी म्हणून उपाध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी हे सांभाळत आहेत.मात्र आता होणाऱ्या पोट निवडणूकीसाठी बंड्या साळवी हे देखील नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत शिवसेनेकडून तयार आहेत.त्यामुळे साळवी यांचे नगरसेवक पदाची जागा रिक्त होणार आहे.
शिवसेना अशाप्रकारे वारंवार सर्वसामान्य नागरिकांवर निवडणूक लादण्याचे काम करत आहे. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे नगरसेवक राजेश सावंत यांचा राजीनामा सेनेने घेतला होता.त्या रिक्त पदासाठी पोट निवडणूक झाली होती.त्यानंतर थेट नगराध्यक्ष राहुल पंडित यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यामुळे रिक्त आलेल्या पदासाठी पोट निवडणूक घ्यावी लागत आहे.आता पुन्हा थेट नगराध्यक्ष निवडणुकीत बंड्या साळवी नगराध्यक्ष झाले तर त्यांचे नगरसेवक पद पुन्हा रिक्त होऊन पुन्हा पोट निवडणूक लागेल.या सातत्याने होणाऱ्या पोट निवडणुकांचा आर्थिक भार नागरिकांच्या माथी मारला जाणार असल्याचे श्री मयेकर यांनी सांगितले.त्यासाठी एकएक पोट निवडणूक घेण्यापेक्षा बंड्या साळवी यांनी आताच आपल्या नगरसेवक पदाचाही राजीनामा द्यावा असे मयेकर यावेळी म्हणाले.. वारंवार होणाऱ्या पोटनिवडणुकीमुळे नागरपालिकेवर पडणारा अतिरीक्त खर्च शिवसेना पक्षाकडून नगरपालिकेच्या फंडामध्ये भरणा करून घ्यावी असे निवेदन आपण जिल्हाधिकाऱ्यांना दिलं असल्याचं मयेकर यावेळी म्हणाले..