भारत/मुंबई, ११ ऑगस्ट २०२१: भारतीय विद्यार्थी संघटना आणि इंग्रजी शिक्षकांनी इंग्लंडमधील प्रवासाच्या निर्बंधातील बदलांचे उत्साहात स्वागत केले. यामुळे इंग्लंडला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी क्वारंटाइन होण्याचा खर्च वाचेल. यूके सरकारनुसार, रविवारी ८ ऑगस्ट रोजी सकाळी ४ वाजता भारत बहरीन, कतार आणि संयुक्त अरब अमीरातसोबत इंग्लिश एम्बर प्रवासाच्या यादीत समाविष्ट केला गेला.
भारतातील स्टडी ग्रुपचे रीजनल डायरेक्टर, करन ललित या निर्णयाचे स्वागत करताना म्हणाले, “यूकेतील एम्बर प्रवासाच्या यादीत भारताचा समावेश करण्यात आला आहे, यामुळे टीसाइड युनिव्हर्सिटी आयएससी, किंग्स्टन युनिव्हर्सिटी आएससी, हडर्सफील्ड युनिव्हर्सिटी आयएससी, कोंव्हेंट्री युनिव्हर्सिटी लंडन, आयएससी आणि यूकेतील इतर अनेक आंतरराष्ट्रीय अध्ययन केंद्रांमध्ये शिक्षण घेण्याची आर्थिक संधी प्रदान केली जाईल. भारतीय विद्यार्थी स्टडी ग्रुपने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या शिक्षण आणि रोजगाराच्या उत्कृष्ट संधींवर लक्ष केंद्रित करू शकतील. जसे की, ‘जॉब रेडी’, याद्वारे विद्यार्थ्यांना शिकतानाच कमाई करण्यास मदत मिळते आणि वर्कफोर्स कौशल्य विकासासाठी ‘व्हर्चुअल इंटर्नशिप’ करता येते.”
भारतातील ब्रिटिश उच्च आयोगाने सांगितल्यानुसार, “एम्बर यादीत असण्याचा अर्थ असा की, इंग्लंडला पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी किंवा ज्या ठिकाणी ते रहात आहेत, तेथे क्वारंटाइन व्हावे लागेल आणि चाचणी करावी लागेल. आम्ही नवीन डेटा आणि सार्वजनिक आरोग्य सल्लागारांच्या सल्ल्याआधारे, आंतरराष्ट्रीय प्रवास सुरक्षित पद्धतीने पुन्हा सुरु करण्यासाठी हे पाऊल उचलत आहोत.”
भारतीय विद्यार्थी संघटनांनी या बदलांचे उत्साहात स्वागत केले. जसे की, यूकेतील सर्वात जन्या आणि सर्वात मोठ्या भारतीय विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांचे नेटवर्क नॅशनल इंडियन स्टुडंट्स असोसिएशन (NISAU) यांनी, ज्यांनी विद्यार्थी शाखा आणि शिक्षण प्रदात्यांसोबत त्यांच्या समर्थकांची ‘कठोर मेहनत आणि भावूक समर्थन’ ची स्तुती केली.
सरकारद्वारे आयोजित क्वारंटाइनसंबंधीत खर्च करावा लागत असल्यामुळे स्वाभाविकच इंग्लंडच्या प्रवासाविषयी चिंतेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. या बदलांमुळे ‘एम्बर’ यादीत समाविष्ट क्षेत्रांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या देशांमध्ये लस घेणे आणि पुन्हा तपासणी करणे आणि आयसोलेट होण्याची सुविधा मिळेल. अशा प्रकारे विद्यार्थ्यांसाठी इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणाचा प्रवास सुरु करण्यातील ही एक सोपी आणि कमी खर्चाची प्रक्रिया बनेल.