मुंबई, २९ ऑगस्ट २०२४: स्टडी ग्रुप या आंतरराष्ट्रीय शिक्षणामधील जागतिक अग्रणी कंपनीला प्रतिष्ठित नॉर्थ अमेरिकन युनिव्हर्सिटीजसोबतच्या सहयोगांचा आपला व्यापक पोर्टफोलिओ दाखवण्याचा अभिमान वाटतो. शैक्षणिक संधींची ही वैविध्यपूर्ण श्रेणी भारतीय विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक ध्येये आणि वैयक्तिक पसंतींना अनुसरून डिझाइन केलेले जागतिक दर्जाचे शिक्षण घेण्यास सक्षम करते.
युनायटेड स्टेट्समधील सहयोगांव्यतिरिक्त स्टेट युनिव्हर्सिटी सॅन मार्कोस, ओमाहा येथील युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्का, लॉंग आयलँड युनिव्हर्सिटी, फ्लोरिदा अॅटलांटिक युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ हार्टफोर्ड आणि टॉसन युनिव्हर्सिटी यांच्यासोबतच्या सहयोगासह स्टडी ग्रुप भौगोलिक, शैक्षणिक अभ्यासक्रम आणि सांस्कृतिक अनुभवांसंदर्भात अद्वितीय पर्याय देते.
स्टडी ग्रुपचे दक्षिण आशियामधील प्रादेशिक संचालक करण ललित म्हणाले, “या प्रतिष्ठित संस्थांसोबतचा आमचा सहयोग भारतीय विद्यार्थ्यांना यू.एस.मध्ये शिक्षण घेण्याचे अनेक पर्याय देतो. आमच्या पोर्टफोलिओमधील प्रत्येक युनिव्हर्सिटी अद्वितीय क्षमता आणि विशेषीकृत प्रोग्राम्स देतात, ज्यामधून विद्यार्थ्यांना त्यांच्या महत्त्वाकांक्षांना अनुसरून जागतिक दर्जाच्या शिक्षणाची खात्री मिळते. विद्यार्थी विशिष्ट कोर्सेस व करिअर संधींचा शोध घेत असो किंवा त्यांना विशिष्ट सांस्कृतिक वातावरणामध्ये सामावून जायचे असो आम्ही विद्यार्थ्यांना योग्य दिशेने वाटचाल करण्यामध्ये मार्गदर्शन करण्याप्रती कटिबद्ध आहोत.”
स्टडी ग्रुपचा सहयोग महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांना अनेक प्रमुख फायदे देतो. तसेच, उपलब्ध असलेल्या शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या व्यापक श्रेणीमधून खात्री मिळते की विद्यार्थ्यांना त्यांची करिअर ध्येये व रूचींनुसार परिपूर्ण शिक्षण मिळू शकते. स्टडी ग्रुपचे पाथवे प्रोग्राम्स आणि सहयोगी युनिव्हर्सिटीज सर्वसमावेशक पाठिंबा देतात, विद्यार्थ्यांना यू.एस.मध्ये शिक्षण घेण्याच्या शैक्षणिक व सांस्कृतिक पैलूंसह सुसज्ज करतात, जे नवीन वातावरणाशी जुळून जाण्याकरिता महत्त्वाचे आहे. करिअर संधी अनेक आहेत, जेथे प्रमुख उद्योग हब्सजवळ असलेल्या अनेक सहयोगी युनिव्हर्सिटीज पदवी शिक्षणानंतर बहुमूल्य कामाच्या संधी देतात.