मुंबई, 17 जून : सरकारने लॉकडाउनमधील निर्बंध हटलव्यानंतर अनेक भारतीय शाळांना नव्या स्वरुपात लवकरच पुन्हा सुरु करण्याची तयारी करावी लागत आहे. याच विषयावर विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया घेण्याच्या उद्देशाने ब्रेनलीद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात विद्यार्थ्यांनी त्यांना शाळेसोबतच ऑनलाईन लर्निंग सुरु ठेवण्यासही आवडेल असे सांगितले. जगातील सर्वात मोठा ऑनलाइन लर्निंग मंच ब्रेनलीद्वारे देशभरातील २६०० विद्यार्थ्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून ऑनलाईन लर्निंगलाही विद्यार्थ्यांचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचे निदर्शनास आले.
कोरोना महामारीबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात आजही भीती आहे म्हणूनच शाळा सुरु होण्यावर विद्यार्थ्यांचा संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. केवळ ३८.७ टक्के विद्यार्थीच लॉकडाउन संपताच शाळेत जाण्याच्या मनःस्थितीत असून ३४% विद्यार्थ्यांची संभ्रावस्था असल्याचे दिसून आले.
ब्रेनलीच्या बहुतांश यूझर्सनी (५५.२ %) लॉकडाउनच्या काळात व्हर्चुअल क्लासेसचा आनंद घेतल्याचे म्हटले. सहभागींपैकी एक तृतीयांश विद्यार्थ्यांनी म्हटले की, यापुढेही ते ऑनलाइन लर्निंग सुरू ठेवतील. ४२.५ % विद्यार्थी म्हणाले की, शाळा सुरू झाल्यानंतरही ते ऑनलाइन शिक्षण सुरूच ठेवतील. तर २८.७% पेक्षा कमी विद्यार्थ्यांनी याबाबत ते निर्णय घेऊ शकत नसून ऑनलाइन लर्निंग हा अजूनही पर्याय असल्याचे म्हटले आहे.
शिकवण्याची पद्धत, प्रामुख्याने एकाच क्लिकवर बहुविध रिसोर्स सहजपणे उपलब्ध असल्याने ऑनलाइन मंच हे विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रियता मिळवत आहेत. सुरक्षित आणि सोशल डिस्टन्सिंग आधारीत इकोसिस्टिमच्या गरजेतून हे परिवर्तन घडत आहे. विद्यार्थ्यी आणि त्यांच्या पालकांसाठी ऑनलाइन लर्निंग हे वेगाने विकसित होणारे सहज उपलब्ध होणारे आणि शिक्षणाचा विश्वासार्ह स्रोत बनत आहे.