StoxBox Technofunda Super 7 स्टॉक्सच्या निवडी जाहीर केल्या आहेत. ही निवड विविध क्षेत्रांमध्ये मजबूत वृद्धीची क्षमता असलेल्या स्टॉक्सचा समावेश करणारी आहे.
Apollo Hospitals (अपोलो हॉस्पिटल्स) चे शेअर ₹7,370 च्या किंमतीला खरेदी करण्याची शिफारस करण्यात आली आहे आणि त्या शेअरच्या किंमतीसाठी ₹7,956 पर्यंत वाढ होण्याचे लक्ष्य आहे. आरोग्यसेवा क्षेत्रात असणारी ही प्रबळ आणि प्रभावी कंपनी तिचा विस्तार करण्याची योजना बनवत आहे. या योजनेत विविध महत्त्वाच्या शहरांत 1,500 नवीन बेड्स वाढवण्याचा विचार आहे. त्यासोबतच ARPOB (Average Revenue Per Occupied Bed) म्हणजेच प्रति बेड सरासरी महसूल सातत्याने वाढवण्याची योजना आहे. ज्यामुळे तिच्यात अल्पकालीन नफा मिळण्याची क्षमता आहे.
IndiGo Airlines (इंडिगो एअरलाईन्स) ची सध्याची किंमत ₹4,490 आहे. ती सतत वाढ होण्यासाठी चांगल्या स्थितीत आहे. तिच्या वाढीला चालना देण्यासाठी नवीन बिझनेस क्लास सेवा, सुधारित डिजिटल अनुभव आणि वित्तीय वर्ष 2025 (FY25) पर्यंत 40 आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांवर विस्तार करण्याची योजना आहे. त्यांच्या या योजनेमुळे या शेअरची किंमत ₹4,883 पर्यंत जाऊ शकते.
Kalyan Jewellers (कल्याण ज्वेलर्स) ची सध्या किंमत ₹779 आहे आणि सध्याच्या वाढत्या बाजारपेठेमुळे आणि त्यांच्या विस्ताराच्या योजनांमुळे कंपनीला फायदा होण्याची स्थिती आहे. कंपनीने ₹849 च्या लक्ष्य किंमतीपर्यंत पोहचण्याचे ध्येय ठेवले आहे. या उद्दिष्टाचा भाग म्हणून, आर्थिक वर्ष 2026 (FY26) पर्यंत 80 हून अधिक नवीन स्टोअर्स उघडण्याची योजना आहे. कल्याण ज्वेलर्सने त्यांच्या उत्पन्नात उल्लेखनीय आणि लक्षवेधी वाढ साधली आहे. त्यांच्या उत्पन्नात मागील वर्षाच्या त्याच कालावधीतील YOY (वर्ष-प्रति-वर्ष) उत्पन्नाच्या तुलनेत 37.4% वाढ झाली आहे.
Muthoot Finance (मुथूट फायनान्स) ची किंमत ₹2,230 ते ₹2,210 या दरम्यान आहे. ही किंमत ₹2,401 पर्यंत पोहोचवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कंपनी गोल्ड लोनच्या वाढत्या मागणीचा प्रभावीरीत्या उपयोग करून घेत आहे. ही मागणी सोन्याच्या वाढत्या किंमती आणि त्यांच्याकडे असलेल्या विस्तृत शाखा नेटवर्कमुळे वाढत आहे. कंपनी त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी आणि लाभ वाढवण्यासाठी या संधींचा उपयोग करत आहे.
Policybazaar (पॉलिसीबझार) ची किंमत ₹2,185 असून ती तिच्या विकासाच्या गतीला कायम ठेवण्याची अपेक्षा आहे. विशेषकरून आरोग्य आणि जीवन विमा प्रिमियम क्षेत्रात वाढ होण्याची संभावना आहे. कंपनीचे उद्दिष्ट ₹2,387 पर्यंत पोहोचण्याचे आहे. कंपनीने PB Health Services (पीबी हेल्थ सर्व्हिसेस) मध्ये 10 कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे ज्यामुळे कंपनीची स्थिती आणखी बळकट झाली आहे.
Sun Pharma (सन फार्मा) चे शेअर ₹1,860 च्या किंमतीला खरेदी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. कंपनीची आपल्या देशात म्हणजेच भारतीय बाजारात विक्री चांगली आहे. तसेच ती अमेरिकेच्या बाजारातील वाढीचा लाभ घेत आहे. त्या विक्रीमुळे कंपनीला फायदा होतोय आणि यामुळे त्यांचे लक्ष्य ₹2,009 पर्यंत पोहोचवण्याची अपेक्षा आहे. शेवटी, United
Spirits (UNITDSPR) ची किंमत ₹1,675 ते ₹1,658 दरम्यान आहे. कंपनीने प्रीमियम अल्कोबेव (alcoholic beverages म्हणजे अल्कोहोलिक पेये) विभागातील त्यांच्या प्रभुत्वामुळे आर्थिक फायद्याची अपेक्षा ठेवली आहे. कंपनी उच्च दर्जाच्या मद्यपेय विक्रेत्यांच्या टॉप श्रेणीमध्ये आहे आणि त्यातून त्यांना अजून फायदा मिळू शकतो. या स्टॉकची किंमत भविष्यात ₹1,789 पर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे.
युनायटेड स्पिरिट्स (UNITDSPR) या कंपनीच्या शेअर्सची सध्याची किंमत ₹1,675-1,658 आहे आणि त्यांचे उद्दिष्ट ₹1,789 गाठणे आहे, ज्यासाठी ₹1,578 वर स्टॉप लॉस सेट करण्यात आला आहे. हे उद्दिष्ट शॉर्ट टर्म म्हणजेच काही काळासाठी आहे. हा स्टॉक मजबूत गतीसह कप-अँड-हँडल पॅटर्नमधून बाहेर पडला असून उच्च आरएसआयने (Relative Strength Index) हे प्रमाणित केले आहे.
यापैकी प्रत्येक स्टॉकमध्ये स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण वाढीची क्षमता आहे. या क्षमता त्यांच्या संबंधित क्षेत्रातील विशिष्ट प्रवृत्तींनी आणि धोरणात्मक उपक्रमांनी प्रेरित आहेत. हे शेअर्स त्यांच्या क्षेत्रांमध्ये काहीतरी वेगळे आणि खास आहेत, ज्यामुळे ते आगामी वर्षासाठी आकर्षक गुंतवणूक संधी ठरतात.