Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२१-२२ च्या स्थापत्य समिती (शहर) अध्यक्ष पदासाठी आज (दिनांक ०८ एप्रिल २०२१) झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार श्री. दत्ता पोंगडे हे १७ मते मिळवून विजयी झाले, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार श्रीमती रिटा मकवाना यांना १० मते मिळाली.
एकूण ३६ सदस्यांपैकी २८ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. या निवडणुकीत ०३ सदस्य मतदानप्रसंगी तटस्थ राहिले. ०५ सदस्य अनुपस्थित होते. या निवडणुकीत ०१ मत अवैध ठरले.
उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार श्री. सचिन पडवळ यांना १७ मते मिळून ते विजयी झाले, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार श्रीमती नेहल शाह यांना १० मते मिळाली.
एकूण ३६ सदस्यांपैकी २८ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. या निवडणुकीत ०३ सदस्य मतदानप्रसंगी तटस्थ राहिले. ०५ सदस्य अनुपस्थित होते. या निवडणुकीत ०१ मत अवैध ठरले.
स्थापत्य समिती (शहर) या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून मुंबईच्या महापौर श्रीमती किशोर किशोर पेडणेकर या होत्या.
स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार श्री. स्वप्निल मोहन टेंबवलकर हे १८ मते मिळवून विजयी झाले. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार श्रीमती प्रतिभा हेमंत शिंदे यांना १३ मते मिळाली.
एकूण ३६ सदस्यांपैकी ३१ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. ०५ सदस्य तटस्थ राहिले.
तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार श्री. सदानंद वामन परब यांना १६ मते मिळवून ते विजयी झाले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. योगीराज नारायणराव दाभाडकर यांना १३ मते मिळाली.
एकूण ३६ सदस्यांपैकी ३१ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. ०५ सदस्य तटस्थ राहिले. या निवडणुकीत ०२ मत अवैध ठरले.
स्थापत्य समिती (उपनगरे) या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून मुंबईचे उप महापौर ऍड. सुहास वाडकर हे होते.