
डोंबिवली, 25 मे (प्रशांत जोशी) : आगरी युथ फोरमच्या वतीने कल्याणअंबरनाथ मँन्युफँक्चरर्स असोसिएशनचे ( कामा) अध्यक्ष देवेन सोनी यांना एका निवेदनाव्दारे ८० टक्के स्थानिक भुमीपुत्रांना रोजगार मिळावा अशी मागणी केली.
सध्या कोरोनाच्या महामारीमुळे परराज्यातील कामगार महाराष्ट्र सोडुन परागंदा झालेले आहेत. त्यामुळे कारखानदार मालकांना इच्छा असुनही कारखाने सुरू करू शकत नाहीत. त्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले आहेत. जर कारखानदारांनी ८० टक्के स्थानिकांना रोजगार दिला असता तर हि वेळ आली नसती. सध्या परराज्यातील कामगार कधी येतील किंवा येतील कि नाही हे ही सांगता येत नाही, त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या स्थानिक भुमीपुत्रांना रोजगार द्यावा अशी मागणी या निवेदनाव्दारे केली.
या संदर्भात कामाचे सर्व पदाधिकारी, कारखानदार मालक व आगरी युथ फोरम यांची संयुक्त चर्चासभा लावावी, ही मागणी कामा अध्यक्ष देवेन सोनी यांनी मान्य करून लवकरच ही सभा आयोजित केली जाईल असे सांगितले. यावेळी आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे , उपाध्यक्ष जालिंदर पाटील , सरचिटणीस रामकृष्ण पाटील, अनंता पाटील , कांता पाटील तसेच कामाचे सचिव राजु बेल्ल्हुर उपस्थित होते