चेन्नई / मुंबई | ऑगस्ट ३, २०२१ – स्टेलंटिस इंडिया पुढील अतिरिक्त नेतृत्वाच्या नियुक्तींची घोषणा करत आहे, जे भारतातील स्टेलंटिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक रोलँड बौचारा, यांना रिपोर्ट करतील.
जोएल वेरनी हे भारतातील स्टेलंटिससाठी, विक्री आणि विपणन या विभागांच्या (एस अँड एम) कार्यक्षमतेसाठी जबाबदार असतील. जोएल हे शैक्षणिक अर्हतेनुसार ऑटोमोबाईल अभियंता आहेत व त्यांनी २० वर्ष सिट्रॉन इंडियासह पीएसएमध्ये काम केले आहे. पुढे जाऊन, ते भारतातील जीप आणि सिट्रोन या दोन्ही ब्रॅण्डची विक्री वाढविणे, गुणवत्ता आणि नफा टिकवून ठेवणे, हे साध्य करण्यास सहाय्य्य करतील. विक्री आणि विपणन या विभागाच्या संपूर्ण परिसंस्थेसाठी प्रक्रिया आणि साधने प्रदान करण्याव्यतिरिक्त, ते या कार्याच्या संपूर्ण व्याप्तीसाठी समन्वय साधतील आणि दोन्ही ब्रँडसाठी सर्वोत्तम पद्धती लागू करतील. २०१७ पासून भारतात स्थित जोएल, याआधी पीसीए इंडियामध्ये सिट्रॉनच्या विक्री आणि नेटवर्क विभागाच्या व्हाईस प्रेसिडेंट (उपाध्यक्ष) या पदावर कार्यरत होते.
आशिष साहनी हे स्टेलंटिससाठी भारतात कस्टमर जर्नी आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी, त्याचप्रमाणे भारत आणि एशिया पॅसिफिक (आयएपी) क्षेत्रीय भागाकरिता डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि परफॉर्मन्स मार्केटिंग यासाठी जबाबदार असतील. आशिष यांनी ऑटोमोबाईल्स, ट्रॅव्हल आणि टूरिझम, इन्शुरन्स आणि मीडिया यांसारख्या उद्योगांमधून, डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट, मार्केटिंग मावेन आणि बिझनेस बिल्डर म्हणून २० वर्षांचा अनुभव आणि प्रतिष्ठा प्राप्त केली आहे. सिट्रोन इंडियाने त्यांच्या नेतृत्वाखाली, भारतीय ग्राहकांना एक अद्वितीय आणि अखंड ऑनलाइन अनुभव आणि किरकोळ प्रवास प्रदान करणाऱ्या आपल्या डिजिटल ग्राहक प्रवासाला आकार दिला. याआधी ते पीसीए इंडियामध्ये डिजिटल मार्केटिंगचे संचालक म्हणून कार्यरत होते.
हितेश जैन यांची स्टेलंटिस आयएपी क्षेत्रीय भागात, जनरल काऊन्सेल, इंडिया या पदावर नियुक्ती झाली आहे आणि ते भारतातील सर्व स्टेलंटिस उद्योगांच्या कायदेशीर कार्यांसाठी जबाबदार असतील. हितेश हे विज्ञान आणि कायद्याचे पदवीधर असून त्यांना वैविध्यपूर्ण संस्थांमध्ये विविध प्रकारच्या कायदेशीर आणि कॉर्पोरेट सचिवांच्या भूमिकांमध्ये काम करण्याचा दोन दशकांचा अनुभव आहे. ते इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे सदस्य आहेत. हितेश तत्कालीन एफसीए इंडियामध्ये कायदेशीर आणि कंपनी सचिव कार्यांसाठी जबाबदार होते.
पुनीत सभरवाल हे स्टेलंटिस इंडियामध्ये वित्त विभागासाठी जबाबदार असतील, आणि जीप तसेच सिट्रोन ब्रँडसाठी विक्री आणि विपणन नियंत्रक (सेल्स अँड मार्केटिंग कंट्रोलर) म्हणूनही जबाबदारी स्वीकारतील. ते भारतातील कामकाजाच्या लेखा, अहवाल आणि कर आकारणी या कार्यासाठी जबाबदार असतील. पुनीत हे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे सदस्य आहेत आणि त्यांना ऑटोमोटिव्ह उद्योगात २५ वर्षांचा वैविध्यपूर्ण कामांचा विस्तृत अनुभव आहे. यापूर्वी, पुनीत पीसीए इंडियाच्या वित्तीय कार्यासाठी जबाबदार होते.
सॅम्युअल जेकब हे, स्टेलंटिस इंडिया आणि एशिया पॅसिफिक (आयएपी) क्षेत्रीय भागासाठी तसेच भारतीय बाजारपेठेसाठी मानव संसाधन प्रमुख म्हणून जबाबदार असतील. सॅम्युअल यांना भारतात आणि परदेशात, आतिथ्य (हॉस्पिटॅलिटी), उत्पादन आणि विमानचालन (एव्हिएशन) यांसारख्या वैविध्यपूर्ण उद्योगांमध्ये एकूण २६ वर्षांचा कामाचा अनुभव आहे.
श्रीजी कुमार हे स्टेलंटिस इंडियामध्ये माहिती तंत्रज्ञान (इन्फर्मेशन अँड टेक्नॉलॉजी) आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन यासाठी जबाबदार असतील. त्यांच्या जबाबदारीमध्ये, विक्री आणि विपणन, विक्रीनंतरची सेवा, उत्पादन, आयात आणि निर्यात, कनेक्टिव्हिटी आणि आरअँडडी या संपूर्ण क्षेत्रात, आयटी आणि तंत्रज्ञान समाधान, यांचा समावेश आहे. २१ वर्षांच्या कामाचा अनुभव असलेले आणि डिजिटल तंत्रज्ञान तज्ज्ञ असलेले श्रीजी यांनी विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आणि उद्योगांमध्ये काम केले आहे. २०२० मध्ये ते तत्कालीन पीसीए इंडियामध्ये मुख्य माहिती अधिकारी म्हणून रुजू झाले, आणि त्यांना सी५ एअरक्रॉस एसयूव्ही बाजारात लाँच करण्यासोबतच एंड-टू-एंड आयटी समाधान उपयोजन करण्याचे आणि सिट्रोन इंडियाच्या उत्पादन कार्याच्या सक्रियतेचे नेतृत्व करण्याचे श्रेय दिले जाते.
एम. राज कल्याणराजन हे, सिट्रॉन ब्रँडसाठी वाहन निर्मितीसाठी जबाबदार असतील. त्यांना भारतात आणि अमेरिकेत, ऑटोमोटिव्ह आणि अर्थमूव्हिंग उद्योगांमध्ये कामाचा २७ वर्षांचा विस्तृत अनुभव आहे. सी५ एअरक्रॉस एसयूव्ही आणि भविष्यातील उत्पादनांच्या निर्मितीसाठी, थिरुवल्लूर येथील ब्राउनफील्ड कार उत्पादन सुविधेला तिच्या निष्क्रिय अवस्थेपासून ते सध्याच्या कार्यांपर्यंत पुनरुज्जीवित करण्यात राज यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
झेवियर डी गोडेमारीस हे, स्टेलंटिस इंडिया येथे पुरवठा साखळी कार्यांसाठी (सप्लाय चेन ऑपरेशन्स) जबाबदार असतील. झेवियर यांनी पुरवठा साखळी उद्योगात २० वर्षांहून अधिक काळ काम केले आहे आणि त्यांच्या नवीन जबाबदारीत उत्पादन नियोजन, वाहन घरगुती आणि निर्यात लॉजिस्टिक्स यांचा समावेश आहे.
गॉरी वेमुलर हे स्टेलंटिस इंडिया आणि आशिया पॅसिफिक (आयएपी) क्षेत्रीय भागांतर्गत, भारतीय ग्राहकांच्या अनुभवासाठी जबाबदार आहेत. ४ वर्षांपूर्वी भारतात आपला ऑटोमोटिव्ह ग्राहक आणि उत्पादनाचा कार्यकाळ सुरू करण्यापूर्वी युरोप, लॅटिन अमेरिका आणि चीनमध्ये पीएसएमध्ये आरअँडडी आणि गुणवत्ता पदांवर अभियंता म्हणून काम करतांना, त्यांनी ४२ वर्षे खर्ची घातली. ते सिट्रोनच्या ग्राहकांच्या समाधानासाठी जबाबदार आहेत, ज्यात वाहनांचे उत्पादन पूर्ण झाल्यानंतर आणि ग्राहकांना त्यांचे वितरण करण्यापूर्वी वाहनांना अंतिम मान्यता मिळेपर्यंत नवीन उत्पादनांसाठी गुणवत्ता लक्ष्य निश्चित करणे याचा समावेश आहे.
जेरोम डब्राक भारतातील उत्पादन वित्त आणि विन्सेंट बॅरन, होसूर प्लांट ऑपरेशन्ससाठी जबाबदार असतील.
“स्टेलंटिस इंडिया संस्था ही खंबीर नेतृत्वासॊबत आपल्या पायावर भक्कमपणे उभी आहे. नियुक्त केलेले वरिष्ठ अधिकारी त्यांच्या व्यापक अनुभवासह, आमचे कामकाज समाकलित करण्यासाठी, आमच्या प्रक्रियांना बळकट करण्यासाठी आणि स्टेलंटिस इंडियाच्या कार्यांना उच्च स्तरावर नेण्यासाठी मला सहाय्य्य करतील.” असे भारतातील स्टेलंटिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक रोलँड बोचरा म्हणाले.















