केवाडिया (गुजरात) : भारताचे पोलादी पुरुष- सरदार वल्लभभाई पटेल यांना अर्पण करण्यात आलेल्या ‘द स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे (एसओयू)माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.
१८२ मीटर्सचा (५९७ फूट) स्टील, काँक्रीट ब्रासने बनवण्यात आलेला हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा असून त्याचे बांधकाम ३३ महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्णकेल्याबद्दल लार्सन अँड टुब्रोला अभिमान वाटतो.
एल अँट टीच्या बांधकाम कंपनीच्या बिल्डींग आणि फॅक्टरी विभागाने ऑक्टोबर २०१४ मध्ये गुजरात सरकारकडून या स्टॅच्यू ऑफ युनिटीचे डिझाइन व बांधकामकरण्याचे प्रतिष्ठित ईपीसी कंत्राट मिळवले होते. पुतळ्यासाठीच्या तरफेचे काम डिसेंबर २०१५ मध्ये सुरू करण्यात आले.
महान गुणवत्ता असलेले सरदार पटेल हे सर्वत्र आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात व नव्याने स्वतंत्र झालेल्या देशाला एकत्र आणण्याचे श्रेयही त्यांनाच दिले जाते. साधू बेट बेटावरील हा एसओयू गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील केवाडिया येथे असलेल्या सरदार सरोवर धरणाच्या दक्षिणेस ३.५ किलोमीचरअंतरावर पुढील पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी दिमाखात उभा आहे. हा पुतळा सरदार पटेल यांच्या असामान्य योगदानाची आठवण करून देत राहील आणि राष्ट्रीयएकात्मता व सचोटीचे प्रतीक म्हणून प्रेरणा देत राहील,
एस. एन. सुब्र्हमण्यम, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणाले, ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी राष्ट्रीय अभिमान व एकात्मतेचेप्रतीक आहेच, शिवाय ते भारताचे अभियांत्रिकी कौशल्य आणि प्रकल्प व्यवस्थापन क्षमता दर्शवणारे आहे. लार्सन अँड टुब्रोने राष्ट्रीय महत्त्वाचे काही प्रकल्प पूर्ण केलेअसून जगातील सर्वात उंच पुतळ्याशी संलग्न असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. हा पुतळा भारताचे पोलादी पुरुष- सरदार वल्लभभाई पटेल यांना योग्य आदरांजली वाहणारा आहे.’
एस. एन. सुब्र्हमण्याम म्हणाले, ‘आमच्या अभियांत्रिकी व बांधकाम टीमने आर्किटेक्ट्स, शिल्पकार, जागतिक कीर्तीचे सल्लागार यांच्या मदतीने माननीय पंतप्रधानांचे स्वप्न विक्रमी वेळेत सत्यात उतरवले आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील व्याप्ती, वेग आणि दर्जासाठी असलेली आमची बांधिलकी या प्रकल्पाच्या पूर्णत्वातून दिसून आलीआहे, जो स्थापत्याच्या बाबतीत उत्कृष्ट आहेच, शिवाय त्याची कलात्मकताही मनाला भिडणारी आहे.’
बिल्डींग आणि फॅक्टरीज विभागाने खरंच खूप मोठी कामगिरी करून दाखवली आहे,’ असे एम. व्ही. सतिश, पूर्णवेळ संचालक आणि कार्यकारी उपाध्यक्ष –बिल्डींग्ज, खाणकाम व धातू विभाग म्हणाले. ‘संकल्पनेपासूनच पुतळ्याचे डिझाइन, वैशिष्ट्ये तयार करण्यासाठी अभियांत्रिकी, प्रकल्प नियोजन, लॉजिस्टिक्स, खर्चनियंत्रण या सगळ्या गोष्टींचे व्यवस्थापन अतिशय प्रभावीपणे केल्याचे टीमच्या विजयात प्रतिबिंबित झाले आहे. देशाला अभिमान वाटायला लावणारे स्मारकउभारल्याचा आम्हाला अभिमान असून याद्वारे आम्ही मोठ्या भारतीय व्यक्तीचा सन्मान करत आहोत याचा आनंद वाटतो.’
एसओयू कॉम्प्लेक्समध्ये तळाला प्रदर्शन केंद्र, स्मारक बगिचा, साधू बेटाला नर्मदा नदीलगत मुख्य जमिनीशी जोडणारा डिझायनर पूल, पाच किमी लांबीचा अंतर्गतरस्ता, साधू बेटाला जोडणारे रस्ते, पूल, पाणीवाहक साधने यांच्यात सुधारणा यांचा समावेश आहे. यामध्ये प्रशासकीय कॉम्प्लेक्स आणि तारांकित हॉटेल (श्रेष्ठा भारतभवन) व कॉन्फरन्स केंद्रही कार्यरत आहे.
हा पुतळा एल अँड टीच्या अभियांत्रिकी कौशल्याचा सर्वोत्कृष्ट नमुना असून सरदार पटेल यांची ओळख असलेले त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कपडे व त्यांची चालण्याची ढब यांचेनैसर्गिक रूप या पुतळ्यात उतरवण्यात आले आहे. संपूर्ण साधू हिलला आच्छादणाऱ्या भौमितिक पृष्ठभागावर चांदणीच्या आकारातून हा पुतळा उभारण्यात आला आहे.या पुतळ्याला सध्या अस्तित्वात असलेल्या तांत्रिक मापदंडापेक्षा अनोख्या प्रकारचे रूंदी ते उंचीचे गुणोत्तर देण्यात आले आहे. या बांधकामाला दोन उभट आकाराचेकोअर्स बसवण्यात आले आहेत, ज्यामध्ये उच्च वेग असलेल्या प्रवासी लिफ्ट्सचा समावेश आहे. या उभट कोअर्स स्टील फ्रेम्सना आधार देतात, ज्यावर ६५०० ब्राँझपॅनेल्स लावण्यात आले आहेत. छातीच्या पातळीला गॅलरी बसवण्यात आली आहे, ज्यामध्ये एका वेळेस २०० लोक सहज मावू शकतात आणि तेथन सरदार सरोवर धरणव सभोवतालच्या परिसराचा थक्क करायला लावणारे दृश्य पाहू शकतात.