मुंबई : गुलाबी थंडी अवतरावी असे वातावरण मुंबईत निर्माण झाले आहे. येथील तापमानात अचानक घट झाली असून कुलाबा येथे २०.८ तर सांताक्रुझ वेधशाळेत १७.२ सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिवसभर बोचरे वारे शहर आणि उपनगरात वाहत होते.
मध्य-महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट तर कोकण-गोवा व मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. १० फेब्रुवारीपर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्यात सर्वात कमी तापमान गोंदीया आणि अहमदनगर येथे १२.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.
गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले किमान तापमान (अंश सेल्सिअस) खालीलप्रमाणे:
मुंबई (कुलाबा) २०.८, सांताक्रुझ १७.२, अलिबाग १८.४, रत्नागिरी १८.९, पणजी (गोवा) २१.०, ढहाणू -, भिरा १७.५, पुणे १३.७, अहमदनगर १२.५, जळगाव १५.०, कोल्हापूर १७.७, महाबळेश्वर १३.८, मालेगाव १३.८, नाशिक १२.६, सांगली १५.९, सातारा १४.९,सोलापूर १५.६, औरंगाबाद १४.४, परभणी १७.५ नांदेड १६.० बीड -, अकोला १८.४, अमरावती १४.०,बुलढाना १७.४, ब्रह्मपुरी १५.८, चंद्रपूर १६.८, गोंदिया १२.५, नागपूर १५.३, वाशिम १६.४, वर्धा १५.५, यवतमाळ १५.६.