रत्नागिरी : रजा शिल्लक असताना देखील पत्नीच्या बाळंतपणावेळी ती मिळाली नाही, त्यामुळे आपले बाळ दगावले, याला कारणीभूत ठरणार्या अधिकार्यांवर कारवाई व्हावी, म्हणून रत्नागिरीतील एका एसटी चालकाने कालपासून उपोषण सुरू केले आहे. गणेश लिंगायत असे त्याचे नाव आहे. वरिष्ठांकडून अन्याय झाल्याचा आरोप त्याने केला आहे. रत्नागिरी आगारासमोर त्याने उपोषण सुरू केले आहे.
तातडीने गरज असतानादेखील रजा दिली गेली नाही. याची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली होती. या घटनेला वर्ष उलटून गेले आहे. अधिक-यांवर कारवाई केली गेली नाही. त्यामुळे आपण उपोषण सुरू केले ,असे लिंगायतने म्हटले आहे. अधिका-यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्याने केली आहे. अद्याप एसटीच्या अधिकार्यांनी त्याच्या उपोषणाची दखल घेतलेली नाही.
लिंगायतला पत्नीच्या बालंतपणाच्या वेळी हवी असणारी रजा अँलोकेशन अधिकार्यानी नाकारली. रजा शिल्लक असताना देखील कामावर हजर राहण्यास सांगितले. त्यामुळे बाळंतपण होत असताना पत्नी जवळ राहता आले नाही याच दरम्यान आपले बाळ दगावलं, असा आरोप त्याने केला आहे.