रत्नागिरी, (आरकेजी) : चिपळूण जवळील कुंभार्ली घाटात भरधाव टँकरने एसटीला जोरदार धडक दिल्याने अपघात घडला. आज सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या या अपघातात एसटीच्या चालकासह काही प्रवासी तसेच टँकर मधील एक महिला गंभीर जखमी झाली.
कुंभार्ली घाटातील एका अवघड वळणावर टँकरने चिपळूण- अकलूज एसटीला समोरुन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती कि, एसटी रस्ता सोडून रस्त्याजवळच्या चरात उतरली. टँकरमधून प्रवास करणारी जांभूळ विक्री करणारी कोंडा बावनदे हि महिला जखमी झाली. तिला उपचारासाठी कराड येथील रुग्णालयात नेण्यात आले. टँकर चालकाविरोधात शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला. अपघातानंतर टँकर चालक फरार झाला.