चालक गंभीर; जखमींवर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
रत्नागिरी, प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात दोन एसटी बसचा समोरासमोर धडकून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सुमारे 25 प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये एक बस चालक गंभीर जखमी असून, सर्व जखमींवर दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या जखमीमध्ये विद्यार्थी व महिलांचा समावेश आहे.
माटवण-बोरिवली बस दापोलीकडे येत असताना मंडणगड मार्गावर मौजे खेर्डीजवळ दापोली- मुरादपुर या दोन एस.टी बसची समोरासमोर धडक झाली. सकाळी ८.३० च्या सुमारास हा अपघात झाला.
दोन्ही बस समोरासमोर धडकल्यामुळे बसचे स्टेरिंग लॉक होऊन बोरीवली माटवण बस मधील ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. सर्व जखमींवर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.