
मुंबई : एसएसएसए स्पोर्ट्स असोसिएशन आणि माजी सैनिकांच्या संघटनेतर्फे जलतरण स्पर्धा पॅसिफिक एनक्लेव हाऊसिंग सोसायटी, क्लब हाऊस पवई येथे संपन्न झाली. मुले आणि मुली यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी स्पर्धकांना सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष आणि ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
माजी सैनिक श्रीधर टक्केकर, यादव तसेच माजी सैनिक, स्पर्धक, पालक यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. एसएसएसए स्पोर्ट्स असोसिएशन अध्यक्ष मनोरमा यादव यांचे सहकार्य, आयोजन लाभले.

















