
रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्याने उकाड्याने हैराण झालेल्या रत्नागिरीकरांना थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे. काल रात्री आणि आज पहाटे तुरळक पावसाची नोंद झाली.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. काल रात्री चिपळूण तालुक्यातील काही भागांत पावसाचा शिडकाव झाला. आज पहाटेही अशीच परिस्थिती होती. हलक्या सरींमुळे आंबा पिकाला धोका नसल्याचे आंबा उत्पादकांनी सांगितले.