चिपळूण, विशेष प्रतिनिधी ः चिपळूण तालुक्यातील शिरळ गट विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आयोजीत लोटे येथील नामांकित एक्सेल इंडस्ट्रीज लि. संचालित विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट द्वारे रेहेळ-भागाडी येथे प्रकाश खेडेकरसाहेब यांच्या बागेमध्ये संपन्न झालेल्या शिबिराला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रास्ताविकात चेअरमन सुनिल टेरवकर यांनी सहकारातील सद्य परिस्थिती कथन करून सोसायटीच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. सहकाराचा विकास हा अनुदानावर नव्हे तर योगदानावर अवलंबून असतो. काळानुरूप जो बदलतो तोच यशाच्या शिखरावर पोहचतो.या उक्तीप्रमाणे शेतीचे पीक, बियाणे, सेंद्रिय खते व यांत्रिकीकरण या गोष्टीवर भर देऊन शिबिर आयोजीत करण्याचा उद्देश विषद केला. शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी श्री. विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, लोटे विविध उपक्रम राबवत आहे. जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या जाती लागवड करण्यास शेतकऱ्याला प्रोत्साहित करणे.शेतीला जोडधंदयासाठी प्रोत्साहित करणे.शेतमालाचे मूल्यवर्धन करण्यावर भर देणे. वारंवार रासायनिक खतांचा वापर झाल्यामुळे जमीन कडक होऊन आर्द्रता, जमिनीतील सूक्ष्मजीवाणू व सूक्ष्म अन्नघटक गतिशील करण्यासाठी व पर्यायायाने शेतीतील कर्बानचे प्रमाण कमी होऊन पिकाला जमिनीतील अन्नघटक मोकळ्या स्वरूपात उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी एक्सेलने बनवलेले एपिसेल हे अत्यंत प्रभावी असून जमिनीतील अन्नघटक मोकळ्या स्वरूपात पिकाला उपलब्ध होतात. पर्यायी उत्पादनामध्ये १५ ते २०% पर्यंत वाढ खात्रीशीर होते. या अनेक उपायांना जोडून असणारा उत्तम पर्याय म्हणजे एक्सेल इंडस्ट्रीज लिमीटेड यांची दर्जेदार उत्पादने यांचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना देण्यात आले. एक्सेलचे सुदर्शन पलुसकर व चंद्रकेतू यांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रभावी ठरलेल्या एपिसेल व कंपोस्ट खतासाठी आवश्यक बायोक्युलम या उत्पादनाची सविस्तर माहिती दिली. दोन्ही उत्पादने वापरून शेतीत झालेले बदल याचा अनुभव स्वतः प्रकाश खेडेकर यांनी सांगितला. निगुडकर यांनी सगुणा राईस टेक्निकवर विस्तृत माहिती दिली. विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे सुरेश पाटणकर यांनी बांबू लागवडीच्या जाती, लागवड व बाजारातील बांबूचे मूल्यावर प्रेरणादायी माहिती दिली. स्वप्नील महाडिक, ओंकार म्हाबदी व सायली भालेकर यांनी जीवामृत आणि गांडुळखताचे महत्व उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगितले. एक्सेलसारख्या नामांकित कंपनीचे शिबिर आयोजित केल्याबद्दल शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आणि फलदायी स्वरूपात शिबिर संपन्न झाले. या शिबिराला पंचायत समिती सदस्य सुनिल तटकरे, शिरळ सोसायटी चेअरमन सुनिल टेरवकर, व्हाईस चेअरमन दिलिप देसाई, ज्येष्ठ संचालक तुकाराम बामणे, संचालक विजय वाजे, राजेंद्र पवार, दिलिप कुळे, विनायक भुवड, रविंद्र मोहिते, संचालिका विजया मोरे, तज्ञ संचालक आत्माराम खेतले, सचिव संजय खेतले, लिपिक दर्शन नाचरे, शेतकरी एकनाथ मोरे, सूर्यकांत तटकरे, अशोकराव नलावडे, तुकाराम खेतले, के एस मोरे, गजानन वाघे, मनोहर माने, शशिकांत राऊत, प्रदिप शिर्के आणि बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सुत्रसंचालन संचालक भाई करंजकर यांनी केले.