मुंबई : आरबीआयच्या मोरॅटोरिअमवर भारतातील रिटेल ग्राहकांना प्रशिक्षण व माहिती देण्याकरिता स्पोक्टो या आघाडीच्या डेटा अॅनालिटिक्सवर आधारीत बँकिंग आणि वित्तीय सेवा देणा-या कंपनीने पुढाकार घेतला आहे. बीटूसी प्लॅटफॉर्म-क्रेडिट मॉनिटरचा लाभ घेत स्पोक्टो ग्राहकांना मोरॅटोरिअम स्वीकारण्यातील गुंतागुंत आणि त्याचा परिणाम समजून घेण्यास मदत करत आहेत. याद्वारे त्यांना माहितीवर आधारीत निर्णय घेता येईल.
तंत्रज्ञानाचा आधार घेत स्पोक्टोने एक संवाद साधणारा चॅटपॉट तयार केला असून तो ग्राहकांना बँक, त्यांची उत्पादने आणि उर्वरीत रक्कमेविषयी माहिती देतो. तसेच मोरॅटोरिअमचा फायदा घेणे किंवा तो नाकारण्याचे काय परिणाम होतील, याबद्दल सांगतो. यासाठी ग्राहकांना आपल्या आर्थिक स्थितीची फार माहिती द्यावी लागत नाही. काही ठोस माहितीआधारे मोरॅटोरिअम स्वीकारण्याचा एकूण परिणाम काय होईल, हे सांगितले जाते.
क्रेडिट मॉनिटरचा बोलका चॅटबॉक्स विविध परिस्थितींचा विचार करून डेटा अॅनालिटिक्स आणि एआयचा वापर करून परिणाम सांगतो. उदाहरणार्थ, एखाद्या वेतनदार व्यक्तीला २० लाखांपेक्षा कमी मूळ वेतन असेल आणि उदाहरणार्थ, २० लाखांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या वेतनदार व्यक्तीचा दहा वर्षांपेक्षा कमी कार्यकाळ राहिला असेल, कोव्हिड-१९ च्या काळात त्याची वेतनकपात होणार असेल तर त्याने किंवा तिने मोरॅटोरिअमचा लाभ घ्यावा आणि नंतर अरिअर्स किंवा बोनसचा वापर करून डिफॉल्ट इंटरेस्ट भरावे, असा सल्ला दिला जातो. याच प्रकारे, क्रेडिट कार्ड/ वाहन कर्जासह ३० वर्षांखालील अविवाहित व्यक्तीस वेतन कपात होणार नसेल तर त्याने याचा लाभ न घेण्याचा सल्ला दिला जाईळ. कारण त्यांच्याकडे पुरेशी बचत असेल.
स्पोक्टोचे संस्थापक आणि सीईओ सुमित श्रीवास्तव म्हणाले, स्पोक्टोचे संस्थापक आणि सीईओ सुमित श्रीवास्तव म्हणाले, ‘आरबीआयने या घोषणेद्वारे सर्व प्रकारच्या कर्जांमध्ये ३ महिने हफ्ता विलंबाने भरण्याची परवानगी दिली आहे. एका व्यक्तीकडे अनेक वित्तीय उत्पादने असू शकतात, त्यामुळे मोरॅटोरिअम स्विकारण्याचा परिणाम प्रत्येकावर वेगळा असू शकतो. सध्याच्या अनिश्चित काळात मोरॅटोरिअमचा लाभ आणि प्रभावावियी उपभोक्त्यांना शिक्षित आणि सुचित करण्याची जबाबदारी स्पोक्टोने घेतली आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. आमचे आधुनिक तंत्रज्ञान आधारित उत्पादने ग्राहकांची निर्णय घेण्याची प्रक्रिया अधिक सरळ बनवतील, त्यांना आपल्या कुटुंबासाठी चांगला निर्णय घेण्यास मदत करतील, असा आम्हाला विश्वास आहे.’