मुंबई : आर्थिक समावेश गाठण्यासाठी फिन-टेक सोल्यूशन्सचा प्रभावी वापर करण्याच्या उद्देशाला समर्पित डिजिस्पाइस समूह कंपनी स्पाइस मनीने त्यांच्या मायक्रो-एटीएमद्वारे या उद्देशाकडे आणखी एक मजबूत पाऊल टाकले आहे, हे एटीएम पॉइंट ऑफ सेल कार्ड मशीन्सच्या डिझाइनसारखेच आहेत. स्पाईस मनीची एईपीएस प्रणाली थम्ब-प्रिंट चलित व्यवहार सक्षम करते, तर त्यांचे मायक्रो-एटीएम डेबिट कार्ड धारक वापरकर्त्यांना आवश्यक आर्थिक व्यवहार करण्याची सुविधा प्रदान करतात. या सुविधेच्या माध्यमातून २ लाख ग्राहक टचपॉइंट्सना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
एटीएमचा तुटवडा विचारात घेतल्यास स्पाइस मनीचे दुहेरी उपाय ‘आधार सक्षम पेमेंट प्रणाली’ आणि ‘मायक्रो एटीएम उपकरण’ या समस्यांना सर्वात प्रभावीपणे हाताळतात. ते पैसे काढणे आणि बॅलन्सच्या चौकशीसारख्या आवश्यक आर्थिक व्यवहारांची सुविधा प्रदान करतात. वापरकर्ते मशीनवर डेबिट कार्ड स्वाइप करू शकतात आणि संबंधित रोख रक्कम काढू शकतात. सुरक्षित पिन/आयडी आधारित प्रणालीद्वारे बॅलन्सची चौकशी सुद्धा केली जाऊ शकते. आपल्या लक्ष्यावर केंद्रित प्रयत्नांमुळे, स्पाइस मनीने आर्थिक सक्षमीकरणाचे एक समांतर आणि कमी खर्चाचे नेटवर्क सुरू करुन राष्ट्रीय बँकिंग व्यवस्थेस बळकटी प्रदान करण्यासाठी अग्रगण्य कंपनी म्हणून स्वत:ला स्थापन केले आहे.
डिजिस्पाइसचे अध्यक्ष दिलीप मोदी म्हणाले की, “भारत आणि इंडिया यांच्यातील अंतर भरून काढणे हा उद्देश स्पाइस मनीच्या प्रयत्नांच्या केंद्रभागी आहे. आमच्या मायक्रो-एटीएम आणि एईपीएस प्रणालीने लोकांना त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या खात्यात पैसे भरण्यास सक्षम केले आहे आणि त्यांनी पूर्वी कधीही केले नसतील त्यापेक्षा जास्त व्यवहार करण्यास सशक्त बनवले आहे. हे तंत्रज्ञानात्मकदृष्ट्या प्रगत सॉल्यूशन्स जसे की प्रगत विश्लेषण, एआय आणि नवीन वितरण प्लॅटफॉर्मच्या शक्तीमुळे साध्य झाले आहे, ज्यामुळे खरोखरच आर्थिकदृष्ट्या समावेशी भारताचे स्वप्न साध्य करता येईल.”