रत्नागिरी (आरकेजी) : सागरी मार्गानं अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे सागरी सुरक्षेचा प्रश्न नेहमी निर्माण होतो. खास करून गस्ती नौका व सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या पोलिसांच्या स्पीड बोटींवर नेहमीच प्रश्न चिन्हं उभं राहते. मात्र आता या सागरी सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या स्पीड बोटींची दुरुस्ती रत्नागिरीतच होणार असल्याची माहिती, अप्पर पोलिसांनी अधिक्षकांनी दिली आहे.
सागरी सुरक्षेची धुरा ही पोलीस यंत्रणेवर आहे. रत्नागिरीला 167 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. यात 11 बंदरे आहेत, 215 जेटी आहेत तर 421 किलोमीटरचा खाडीकीनारा आहे. त्यामुळे इथं सागरी सुरक्षा भक्कम असण गरजेचं आहे. शासनानं यासाठी दहा स्पीडबोटी दिल्या आहेत. मात्र, यातील केवळ चारच स्पीड बोटी सध्या कार्यन्वीत आहेत. तांत्रीक बीघाड झालेल्या या बोटी ट्रकमधून मुंबईला नेऊन दुरुस्त करुन आणाव्या लागतात यासाठी खर्च आणि वेळही वाया जातो. आता रत्नागिरीत या स्पीड बोटी दुरुस्त केल्या जाणार आहेत. कोकण किनारपट्टी ही अतिसंवेदशील आहे. मुंबई हल्ल्यांतर सागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. ही सागरी सुरक्ष मजबूत करण्यासाठी रत्नागिरीला दहा स्पीडबोटी देण्यात आल्या होत्या. मात्र इथं वर्कशाँप नसल्यानं त्या बोटी मुंबईकडे न्यावा लागत होत्या. आता गोवा शिपयार्डशी करार करण्यात आला आहे. त्यामुळे या बोटी आता रत्नागिरीत दुरुस्त केल्या जाणार आहेत. शासनाचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.