रत्नागिरी : दिनांक ०३ ऑगस्ट रोजी रत्नागिरी- दक्षिण विभागाचा ५७ वा युवा महोत्सव एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयामध्ये पार पडला. यामध्ये भारत शिक्षण मंडळाचे देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाने पुढील स्पर्धा प्रकारांमध्ये यश संपादन केले.
कथाकथन(हिंदी)- सोनिया शुक्ला (द्वितीय वर्ष वाणिज्य)- द्वितीय क्रमांक, वादविवाद (मराठी)-. ईश्वरी पवार (द्वितीय वर्ष वाणिज्य), सिद्धी पवार (तृतीय वर्ष वाणिज्य)- तृतीय क्रमांक, वक्तृत्व (मराठी)- गौरवी ओळकर (प्रथम वर्ष वाणिज्य)- उत्तेजनार्थ
यशस्वी विद्यार्थ्यांचे भारत शिक्षण मंडळ आणि महाविद्यालयातर्फे अभिनंदन करण्यात आले. यावेळी भारत शिक्षण मंडळ उपाध्यक्ष श्री दिनकर पटवर्धन हे उपस्थित होते. या वेळी प्रभारी प्राचार्या सौ.मधुरा पाटील, उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. वैभव कीर, सांस्कृतिक विभागातील इतर सदस्य, उपस्थित होते.