नवी दिल्ली, 6 जून 2021 : भारतीय हवामान खात्याच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्रानुसार:
नैऋत्य मान्सून अरबी समुद्राच्या मध्य भागांतील आणखी काही भागात अधिक सक्रीय झाला असून त्याने महाराष्ट्रातील आणखी काही भाग, संपूर्ण कर्नाटक, तेलंगणाचा काही भाग, संपूर्ण तामिळनाडू, आंध्र प्रदेशचा काही भाग, बंगालच्या उपसागरातील अधिक भाग आणि बंगालच्या उपसागरातील ईशान्य भाग आणखी व्यापून टाकला आहे.
उत्तर महाराष्ट्र किनाऱ्यापासून उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत समुद्राच्या पातळीवरुन, समुद्राच्या तळाशी आणि खालच्या उष्ण कटिबंधीय क्षेत्रांमधील कोकण आणि गोवा दरम्यानच्या भागात, तसेच दक्षिण-द्वीपकल्प आणि पश्चिम किनारपट्टीवरील काही भागात दिनांक 06 जून 2021 रोजी सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळ; विजांचा कडकडाट होऊन मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारताच्या वायव्येकडील पठारावरील पृष्ठभागावर 8 ते 10 जून दरम्यान (ताशी 25-35 किमी) वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे
06 जून (पहिला दिवस): राज्यात मराठवाडा, कोकण आणि गोवा येथील तुरळक ठिकाणी गडगडाट आणि वादळी वारे (ताशी 40-50 किमी) वेगाने वाहण्याची शक्यता आहे.
नैऋत्य आणि पश्चिम मध्य अरबी समुद्रात वादळी वारे (ताशी 40-50 किमी, आणि सोसाट्याचे वारे वेग ताशी 60 किमी पर्यंत वाढत जाण्याची) वाहण्याची दाट शक्यता आहे. मच्छीमारांनी समुद्रामध्ये उतरु नये असा सल्ला देण्यात आला आहे.
07 जून (दुसरा दिवस): मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोवा येथील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे वाहतील,( ताशी 40-50 किमी) असा अंदाज आहे