रत्नागिरी : सोशल मीडियावर फिरत असलेला युजीसीचा अहवाल आजपर्यंत आम्हाला प्राप्त झाला नसल्याचं स्पष्टीकरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
महाविद्यालयांच्या परीक्षा कधी होणार, किंवा महाविद्यालये कधी सुरू होणार याबाबत विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युजीसीचा एक अहवाल सोशल मीडियावर फिरत आहे. याबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना विचारलं असता, युजीसीचा अहवाल सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र तो अद्यापपर्यंत मंत्रालयापर्यंत काही आलेला नसल्याचं सामंत यांनी म्हटलं आहे. तसेच अहवाल जरी आमच्यापर्यंत आला नसला तरी युजीसीने ज्या काही बाबी म्हटलेल्या आहेत, त्याचा अभ्यास डिपार्टमेंटने सुरू केलेला आहे. तो योग्य आहे की नाही याचा खुलासा कमिशनर समोर तो जाईल, आणि कमिशनसमोर गेल्यानंतर युजीसीचे चेअरमन जेव्हा त्याला मान्यता देतील आणि युजीसीच्या चेअरमनचं अधिकृत पत्र ज्यावेळी शासनाला येईल, विद्यापिठाला येईल त्याच वेळी तो आम्ही ग्राह्य धरू.. पण सध्या सोशल मीडियावर जो युजीसीचा अहवाल आला आहे, त्याचा आम्ही अभ्यास करतोय, त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतोय, अकॅडमीक इयर नेमकं कधी असावं याबाबत आम्ही चर्चा करतोय. पण युजीसीचा अहवाल किंवा युजीसीचं अधिकृत पत्र आजपर्यंत आम्हाला प्राप्त झालेलं नसल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.