मुंबई : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची वर्सोवा येथे आज जाहीर सभा होणार होती. पंरतु, मुसळधार पावसामुळे
सभा पुढे ढकलण्यात आली आहे. सभा लवकरच होणार असून तारीख, स्थळ व वेळ कळविण्यात येणार आहे.
जम्मू काश्मीरसाठीचे स्वतंत्र कलम 370 आणि कलम 35 ए रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने घेतला. यामागील नेमकी सरकारची भूमिका काय?हे जाणून घेण्यासाठी आज बुधवार 4 सप्टेंबर रोजी सायं. 5 वाजता वर्सोवा येथील लोखंडवाला गार्डन नंबर 2 या ठिकाणी मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा होणार होती. प्रमुख वक्त्या म्हणून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उपस्थित राहणार होत्या.