
~ मेड-इन-इंडिया धोरणाच्या पाठबळावर ११७,००० गाड्यांची विक्री केली ~
मुंबई, 17 जानेवारी २०२६: स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया (SAVWIPL) ने आजवरच्या सर्वाधिक दमदार परफॉर्मन्ससह 2025 या वर्षाचे समापन केले. या उद्योगातील मजबूत रिकव्हरी आणि सर्व सेगमेन्टमधील वाढत्या मागणीचे त्याला पाठबळ मिळाले. या समूहाने 117,000 गाड्या विकून आजवरची त्यांची या देशातील सर्वाधिक विक्री नोंदवली. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ सुमारे 36% आहे. एकंदर विक्री 159,500 (देशांतर्गत आणि निर्यात) झाली आहे. अशाप्रकारे, हे एक लक्षणीय वर्ष ठरले आहे, ज्यात SAVWIPL ने 2 मिलियन मेड-इन-इंडिया वाहनांचा आकडा पार केला, ज्यातून त्यांच्या उत्पादनाचे प्रमाण आणि परिपक्वता दिसून येते.
एमक्यूबी-ए0-इन प्लॅटफॉर्म- हा खास करून भारतासाठी विकसित केलेला प्लॅटफॉर्म असून स्कोडाच्या विकासाच्या केंद्रस्थानी तो आहे. आता स्थानिक पातळीवर बनणाऱ्या स्कोडा आणि फॉक्सवॅगन मॉडेल्ससाठी आधार बनला आहे. एसएव्हीडब्ल्यूआयपीएलने त्यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणात देखील एक लक्षणीय टप्पा गाठला आहे. एकंदर निर्यात ७१५,००० युनिट्सच्या पार गेली असून भारत या समूहासाठी एक धोरणात्मक जागतिक उत्पादन केंद्र म्हणून स्थापित झाला आहे. आणि आसियान प्रांतातील नवीन बाजारपेठांचा शोध घेऊन आणि त्यात प्रवेश करून या समूहाने आपली जागतिक उपस्थिती वाढवली आहे.
स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडियाचे मॅनिजिंग डायरेक्टर आणि सीईओ पियुष अरोरा म्हणाले, “२०२५ हे वर्ष आमच्यासाठी अर्थपूर्ण आणि व्यापक विकास साध्य करणारे होते. ही गोष्ट लक्षवेधी आहे की, आमच्या कामगिरीचा आधार निरंतर अंमलबजावणी आणि भारतासाठीचा दीर्घकालीन रोडमॅप आहे. सखोल स्थानिकीकरण, स्केल आणि मजबूत उत्पादन पाइपलाइन यांचे समर्थन लाभलेल्या आमच्या मेक-इन-इंडिया धोरणाची ताकद उत्पादन, विक्री आणि निर्यातीमधून दिसून येते. २०२६ मध्ये प्रवेश करताना, आमच्या प्राथमिकता स्पष्ट आहेत: आमच्या पोर्टफोलियोचा विस्तार करणे आणि ग्राहकांच्या गरजेनुसार आमच्या नेटवर्कचा प्रसार करणे तसेच एक दर्जेदार जागतिक उत्पादन केंद्र म्हणून भारताची भूमिका मजबूत करणे. या वर्षात मिळालेल्या गतीमुळे आमचा हा विश्वास दृढ झाला आहे की, आमच्या समूहाच्या जागतिक विकासयात्रेत भारताचे योगदान यापुढे आणखी मोठे असेल.”
या वर्षात ब्रॅंडचा परफॉर्मन्स ठळकपणे उठून दिसला. फॉक्सवॅगनने प्रीमियम सेडान वर्गात आपली आघाडी कायम राखली आहे. यात व्हर्टसने इयरटूडेटमध्ये ३८% सेगमेन्ट शेअरसह वर्चस्व निर्माण केले, तर गोल्फ जीटीआयची पहिली बॅच लॉन्चनंतर काही दिवसांतच विकली गेली. स्कोडाने १०७% वृद्धी नोंदवली आहे, ज्यामागचे कारण आहे, सब-४-मीटर कायलाकची जबरदस्त मागणी आणि ऑक्टेव्हिया आरएसचे जोरदार पुनरागमन. यावरून ग्राहकांचे या ब्रॅंडशी किती घट्ट नाते आहे, हे दिसते. याच वेळी, समूहाने ब्रॅंड्समध्ये कस्टमर टचपॉईंट्स ७०० पर्यंत वाढवले आहेत, ज्यामुळे भारतभर एक विश्वासार्थ आणि व्यापक सेवा नेटवर्क तयार झाले आहे.
प्रीमियम सेगमेन्टमध्ये, ऑडीने क्यू७ सिग्नेचर आवृत्ती, क्यू३ आणि क्यू५ सिग्नेचर लाइन्स दाखल केल्या आणि पुरस्कारप्राप्त आरएसक्यू८ परफॉर्मन्स देऊन शक्ती, नेमकेपणा आणि लक्झरी यांचा नवीन मापदंड स्थापन केला. लॅम्बॉर्गिनीने टेमेरारियो लॉन्च केली तर रेव्ह्यूल्टोला ‘सुपर कार ऑफ द यर’ म्हणून सन्मानित करण्यात आले. पॉर्शने १३ पॉईंट्सपर्यंत आपला विस्तार वाढवला आणि ग्राहकांचा सहभाग अधिक गहिरा करण्यासाठी नवीन अनुभवात्मक फॉरमॅट दाखल केले. बेन्टली सहाव्या ब्रॅंडच्या रूपात एसएव्हीडब्ल्यूआयपीएलमध्ये दाखल झाली आणि मुंबई, बंगळूर आणि दिल्लीत नवी डीलरशिप स्थापन झाली.















