-२०२२ मध्ये ६ लाँचसह उत्पादन कायम
- २०२१ च्या तुलनेत विक्रीमध्ये तिप्पट वाढ करण्याचा आणि २०२२ मध्ये आतापर्यंतच्या सर्वोच्च विक्रीचा टप्पा गाठण्याचा मनसुबा
- २०२२ मध्ये ग्राहक टचपॉइण्ट्समध्ये २५ टक्क्यांहून अधिक वाढ करण्याचे लक्ष्य
- ग्राहक समाधान वाढवण्यासाठी नवीन उपक्रम राबवणार
- २०२५ पर्यंत १,००,००० युनिट्सच्या विक्रीचा टप्पा गाठण्याच्या दिशेने वाटचाल
- स्कोडा इंडियासाठी भारत असणार अव्वल दहा बाजारपेठांपैकी एक
मुंबई, ६ जानेवारी २०२२: २००१ मध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये प्रवेश केल्यापासून स्कोडा ऑटो इंडियासाठी वर्ष २०२२ हे सर्वात मोठे वर्ष ठरण्याची अपेक्षा आहे. आपल्या सातत्यपूर्ण उत्पादन सादरीकरण मोहिमांभोवती निर्माण करण्यात आलेले केंद्रित बाजारपेठ धोरण, विक्रीपश्चात्त व ग्राहक समाधान स्रोतांमध्ये वाढ करण्यावरील, तसेच देशभरातील आपली नेटवर्क उपस्थिती वाढवण्यावरभर यांसहस्कोडा ऑटो इंडियाचा २०२२ मध्ये वार्षिक विक्री आकारमान तिप्पट करण्याचा आणि मागील वर्षात निर्माण केलेली सकारात्मक गती अधिक प्रबळ करण्याचा मनसुबा आहे.
२०२० मध्ये १०,३८७ कार्सच्या विक्रीनंतर स्कोडा ऑटो इंडियाने २०२१ मध्ये २३,८५८ युनिट्सच्या विक्रीसह १३० टक्क्यांची तीन अंकी वाढ संपादित केली. २०२२ साठी स्कोडा ऑटो इंडियाचा २०२१ मधील विक्री आकारमानांमध्ये तिप्पट वाढ करण्याचा आणि २०२५ पर्यंत स्थापित करण्यात आलेले १,००,००० युनिट्सचे मध्यावधी लक्ष्य कायम ठेवण्याचा मनसुबा आहे. २०२१ मधील वाढ आणि २०२२ साठी वाटचाल इंडिया २.० प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वी अंमलबलावणीवर आधारित आहे. या प्रकल्पामध्ये विशेषत: भारतासाठी डिझाइन करण्यात आलेल्या एमक्यूबी एओ इन प्लॅटफॉर्मच्या विकासाचा समावेश होता. या प्लॅटफॉर्मने कुशकच्या लाँचसाठी पाया रचला.
नववर्षाच्या शुभारंभासह स्कोडा ऑटो इंडिया २०२२ साठी नियोजित करण्यात आलेल्या ६ उत्पादन लाँचपैकी पहिले उत्पादन नवीन कोडियक १० जानेवारी रोजी लाँचकरणार आहे. हीच गती नवीन स्लाविया सेदान कायम राखेल. कुशकप्रमाणे त्याच एमक्यूबी एओ इन प्लॅटफॉर्मवर निर्माण करण्यात आलेली स्लाविया कुशकसह स्कोडा ऑटो इंडियाच्या २०२२ वर्षासाठी टॉर्चबेअरर ठरेल. उत्पादन श्रेणीवर भर देण्यासोबत त्यामध्ये सुधारणा देखील करण्यात येतील, ज्यामध्ये कुशक, ऑक्टाविया व सुपर्ब यामधील अद्ययावत सुधारणांचा समावेश आहे.
स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रॅण्ड संचालक श्री. झॅक होलिस म्हणाले,”मला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, २०२१ हे स्कोडा ऑटो इंडियासाठी विकास वर्ष राहिले आहे. टीमची कटिबद्धता आणि प्रबळ ग्राहक-केंद्रित ब्रॅण्ड निर्माण करण्याप्रती दृष्टिकोनामुळे ही वाढ शक्य झाली आहे. महामारी आणि जागतिक चिप तुटवड्याची आव्हाने असताना देखील स्कोडा ऑटो इंडिया आपल्या दृष्टिकोनाशी कायम राहिली आणि २०२१ मध्ये १३० टक्के वाढीची नोंद केली. आम्ही या प्रबळ गतीला अधिक दृढ करू आणि सतत उत्पादन सादरीकरणांसह उत्पादनांच्या वैविध्यपूर्ण श्रेणीवर भर देऊ. सोबतच आम्ही ग्राहक समाधानाची नवीन मानके स्थापित करू आणि विक्री-पश्चात्त अनुभवामध्ये वाढ करत आमचे नेटवर्क विस्तारीकरण व आमच्या विक्री आकारमानांमध्ये वाढ करत राहू. मला विश्वास आहे की, या कृतींमुळे स्कोडा ऑटो इंडिया २०२२ मध्ये रेकनिंग कंपनी म्हणून उदयास येईल. नववर्षाच्या शुभारंभासह आम्ही स्थापित केलेली ध्येये संपादित करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत, ज्याचा भारताप्रती आमच्या कटिबद्धतेवर सकारात्मक प्रभाव दिसून येतो.”
विक्रीमधील नवीन फोकस क्षेत्रे:
२०२२ साठी विक्री आकारमानांमध्ये प्रबळ वाढ करण्यासाठी ब्रॅण्ड त्यांच्या ‘सर्टिफाईड प्री-ओन्ड’ ब्रॅण्ड,’कॉर्पोरेट सेल्स’ उपक्रमांसारखे नवीन व विद्यमान मार्ग निर्माण करेल, ग्रामीण बाजारपेठांमधील प्रवेशामध्ये वाढ करेल आणि डीलर मनुष्यबळ प्रशिक्षणावरील भर कायम ठेवेल, जे व्यवसाय कार्यसंचालनांसाठी आवश्यक आहे.
२०२२ मध्ये सर्व आऊटलेट्समध्ये ‘सर्टिफाईड प्री-ओन्ड’ ब्रॅण्ड कार्यान्वित करण्याची योजना आहे. व्यवसाय प्रक्रियेमध्ये अगोदरपासूनच उच्चस्तरीय डिजिटायझेशन सुरू आहे आणि मोबाइल अॅपचा वापर करत ११५ मुद्दयांसंदर्भात वाहनाचे मूल्यांकन करण्यात आले आहे. ‘कॉर्पोरेट सेल्स’संदर्भात ब्रॅण्डने बँका व आर्थिक संस्थांसोबत सहयोग केला आहे आणि २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये १२७ टक्के वाढीची नोंद केली आहे. २०२२ मध्ये कॉर्पोरेट सेल्स प्रवेश जवळपास ३० टक्क्यांनी वाढवण्याचा उद्देश आहे.
ब्रॅण्डला ग्रामीण बाजारपेठांच्या योगदानामध्ये वाढ होताना दिसत आहे. २०२० मधील जवळपास ५ टक्क्यांवरून ग्रामीण बाजारपेठांमधील विक्रीचे प्रमाण २०२१ मध्ये जवळपास १० टक्क्यांपर्यंत वाढले. देशभरातील जलद नेटवर्क विस्तारीकरणासह २०२२ मध्ये ग्रामीण बाजारपेठांमधून देखील योगदानाला चालना मिळेल.
विक्रीसंदर्भातील या सर्व कृतींचा अर्थ असा आहे की, ब्रॅण्ड स्कोडा ऑटोसाठी अव्वल १० बाजारपेठांमध्ये असण्यासोबत भारतातील अव्वल १० ओईएम्समध्ये असेल, जे मोठे यश असेल.
नेटवर्क विस्तारीकरणामध्ये वाढ:
इंडिया २.० प्रकल्पाचा प्रमुख आधारस्तंभ देशभरातील नेटवर्क उपस्थिती स्थिररित्या वाढवण्याचा होता. २०२१ मध्ये१७५ हून अधिक टचपॉइण्ट्ससह ब्रॅण्डने जवळपास ५० टक्क्यांनी आपली उपस्थिती वाढवली आहे. २०२२ मध्ये १७५ वरून २२५ टचपॉइण्ट्सचा टप्पा गाठण्याच्या मनसुब्यासह यांसदर्भात अधिक कृती दिसण्यात येतील, ज्यामुळे २५ टक्क्यांहून अधिक वाढ होईल.
सेवा उपस्थितीमधील वाढ या विकासाला चालना देईल. सेल्स शाखा असलेले आणि सर्व ग्रामीण भागांमध्ये विक्रीपश्चात्त सुविधा उपलब्ध करून देणारे नवीनच सादर करण्यात आलेले कॉम्पॅक्ट वर्कशॉप ब्रॅण्डला २०२२ मध्ये भारतातील ६० हून अधिक ग्रामीण भागांच्या गरजांची पूर्तता करण्यास सक्षम करेल.
विक्री-पश्चात्त व ग्राहक-केंद्रित कृतींमध्ये वाढ:
ग्राहक समाधानाचे वचन कायम राखणे हा ब्रॅण्डसाठी महत्त्वपूर्ण फोकस क्षेत्र राहिले आहे. विक्री-पश्चात्त सेवेसंदर्भात ब्रॅण्डने मालकीहक्काच्या कमी खर्चासह ग्राहक अनुभवामध्ये वाढ करण्याच्या दिशेने विविध उपाय हाती घेतले आहेत. यामध्ये इंजिन ऑईल किंमतीमध्ये (गॅसोलाइन इंजिन्स) ३२ टक्के घट आणि जवळपास २१ टक्के कमी एकूण मेन्टेनन्स खर्चांचा समावेश आहे. ब्रॅण्डने वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या सर्विस कॉस्ट कॅल्क्युलेटरसह अधिक पादर्शकतेसाठी उपक्रम देखील राबवले आहेत. २०२२ मध्ये प्रशिक्षित कुशल कर्मचारीवर्गामध्ये वाढ, सेवा दर्जामध्ये सुधारणा, नवीन विक्री-पश्चात्त उपक्रमांचे सादरीकरण (लॉयल्टी ऑफरिंग्ज) आणि अधिक पादर्शकतेच्या माध्यमातून ग्राहक विश्वास निर्माण करण्याप्रती प्रयत्न केले जातील. सर्विस कॅम, मोबाइल सर्विस वॅन्स एक्स्प्रेस सर्विस ऑफरिंग्ज यांसारखे उपक्रम ग्राहक अनुभवामध्ये वाढ करण्यास साह्य करतील.
या विकासाला स्कोडा ऑटो इंडियाच्या ग्राहक नवोन्मेष्कार व मोहिमा देखील चालना देतील- जसे स्कोडा ऑटो इंडिया वेबसाइट, व्हॉट्सअॅप व फेसबुक पेजेसवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबोटचे सादरीकरण. हे एआय आहे, जे कार खरेदीचा निर्णय घेताना लोक ब्राऊज करणा-या व्यासपीठांवरील माहिती व इंटरअॅक्टिव्हीटी स्तरांमध्ये वाढ करते. तसेच मालकीहक्काचा कमी खर्च, पार्टसच्या किंमतीमध्ये कपात, सर्विस सेंटर्सची उपलब्धता आणि सेवा प्रक्रियेच्या डिजिटायझेशनची सुविधा देणा-या ‘पीस ऑफ माइण्ड’ मोहिमेसारख्या ग्राहक-केंद्रित उपक्रमांनी स्कोडा ऑटो इंडियाच्या ग्राहक कृतींना चालना दिली.
२०२२ मध्ये प्रवेश करताना स्कोडा ऑटो इंडियाचा सर्व ग्राहक टचपॉइण्ट्समध्ये प्रशिक्षण व उपक्रमांच्या सातत्यपूर्ण अंमलबलावणीच्या माध्यमातून ग्राहक-केंद्रित दृष्टिकेनामध्ये अग्रणी स्थान संपादित करण्याचा मनसुबा आहे.
आपल्या उत्पादन श्रेणीमध्ये प्रमुख कृती, विक्री धोरण, नेटवर्क विस्तारीकरण, विक्री-पश्चात्त उपक्रम आणि ग्राहक-केंद्रितवरील फोकससह स्कोडा ऑटो इंडियाचे २०२२ ला भारतातील सर्वात मोठे वर्ष बनवण्यासाठी प्रबळ धोरण आहे.