मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी, कणकवली, देवगड अशा अनेक तालुक्यात कुणबी समाज प्रचंड संख्येने आहेत. परंतु, समाजाला एकसंघ करण्यासाठी मध्यवर्ती संघटन नाही. जिल्ह्यात समाज मोठ्या संख्येने असतानाही त्याचे अस्तित्व जाणवत नाही. राजकीय पुढारी लोकांनी समाजाला दिशाहीन करत आहेत. त्यामुळे कुणब्यांचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणबी समाजाला एकसंघ करण्याचे काम युवापिढी करणार असल्याचे निलेश कुळ्ये यांनी सांगितले.
कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका वैभववाडी यांच्या अधिपत्याखाली मुंबईत एक चर्चात्मक सभा घेण्यात आली. यावेळी समाज संघटना पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी वैभववाडी शाखेचे अध्यक्ष रामचंद्र मांडवकर आणि कुणबी युवाचे अध्यक्ष माधव कांबळे यांनी उपस्थित समाज बांधव यांना संघटनेची गरज व आपल्या समस्या याबाबत मार्गदर्शन केले. तसेच समाजाला संघटीत करण्यासाठी मे २०१८ मध्ये ग्रामीण ठिकाणी भव्य समाज मेळावा घेणार असून संघटना बांधणी करिता भेटी-गाठी घेण्यात येणार असल्याचे सांगितले.