मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाज प्रमाणपत्र पडताळणी प्रश्न 2 महिन्यात सोडविणार असल्याची ग्वाही आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिष्टमंडळास दिली.
माजी आमदार प्रमोद जठार यांच्या नेतृत्त्वात सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज, सिंधुदुर्ग या संस्थेचे अध्यक्ष निलेश लक्ष्मण ठाकूर, दिलीप महादेव मसके व इतर पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात आदिवासी विकास मंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या. यावेळी शिष्टमंडळासोबत बोलताना सवरा यांनी हा प्रश्न तातडीने सोडविण्यासंदर्भात विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या शिष्टमंडळात अतुल काळसेकर, वैभव ठाकूर, परशुराम गंगावणे, दादा मसके, रामा ठाकूर, बबलू सावंत आदींचा समावेश हो