रत्नागिरी (आरकेजी): देशभरातील सीमेन्समध्ये काम करणारे आणि सेवानिवृत्त झालेल्या हजारो सिमेन कर्मचार्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. शासनाला जाग आणण्यासाठी 25 जूनला देशभरात सिमेन कर्मचार्यांकडून मुंबईत हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. फॉरवर्ड सिमेन्स युनियन ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया रिटायर्ड सिफेरर्स फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी हि माहिती आज दिली आहे.
सिमेन सेवायोजन कार्यालये बंद झाल्याने सिमेन भरती, पदोन्नती आदी प्रक्रिया बंद झाली आहे. जहाजावर काम करणार्या सिमेनचे वेळीच पगार होत नसल्याने कौटुंबिक घडी विस्कटते. कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही. एकदा जहाजावर काम केले तर पुन्हा नोकरी मिळण्याची हमी नाही. त्यामुळे सिमेन कर्मचारी अडचणीत आले आहेत. फॉरवर्ड सिमेन्स युनियन ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया रिटायर्ड सिफेरर्स फेडरेशनचे वतीने 25 जूनला या मागण्यांसाठी हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनात सिमेन कर्मचार्यांचे प्रमुख मागण्यांमध्ये आये. एल. ओ. एम. एल. सी. 2006 पर्यंतच्या सर्व कर्मचार्यांना किमान वेतन तत्काळ लागू करा, सेवानिवृत्त कर्मचार्याना पेन्शन द्या, कुटुंबीयांना वैद्यकीय सेवा मिळावी, वेतन करार करणाच्या संघटनेची पाच वर्षात निवडणूक व्हावी आणि कोणत्या संघटनेने करार करावा हा हक्क कर्मचार्यांना असावा आदी मागण्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात सुमारे 25 हजार सिमेन कर्मचारी असल्याचा दावा संघटनेचे पदाधिकारी प्रमोद शेरे यांनी केला आहे.
मुंबईत होणार्या आंदोलनात जिल्ह्यातील कर्मचार्यानी मोठ्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन संघटनेचे जनरल सेक्रेटरी नरेश बिरवाडकर यांनी केले आहे.