दिवा : कोकणात जाणाऱ्या सर्व एक्सप्रेस गाड्याना कायम स्वरूपी दिवा स्थानकात थांबा देण्यांत यावा, सणांच्या कालावधीत कोकणात जाण्यासाठी दिवा ते सावंतवाडी आणि सावंतवाडी ते दिवा विशेष गाडी सुरु करण्यात यावी, दिवा शहरातून कोकणात जाण्यासाठी एस टी बस सेवा कायम स्वरूपी सुरु करण्यात यावी या प्रमुख मागण्यासाठी दिवा कोकण विकास प्रतिष्ठान संघटने तर्फे दिवा रेल्वे स्थानकात भव्य सह्यांची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला .दिव्यात कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणात राहतात. सणासुदीच्या तसेच सुट्टीच्या वेळी लोकांना गावी जाताना विशेष म्हणजे जेष्ठ नागरिकांना रेल्वेने प्रवास करताना नाहक त्रासालासामोरे जावे लागते .गर्दीतून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो या साठी कोकण वासियांना कोकण रेल्वेचा आणि एस टी बस सेवेच लाभ व्हावा , साठी सह्यांची मोहीम घेण्यात आली. मोहीम राबवण्यासाठी अध्यक्ष शांताराम चव्हाण,उपाध्यक्ष नंदू खामकर ,सचिव राजेश कदम ,उप सचिव विनायक निंबाळकर,खजिनदार राजन परब उप खजिनदार प्रदीप गुरव,सल्लागार रवींद्र देसाई,संजय सातोपे,खुशाल वर्तक ,विलास नारकर,श्रीकांत दळवी,दिलीप पांचाल ,कोकण वृत्तसेवा चे संपादक रुपेश तांबे आणि सर्व सभासद,कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली