
रत्नागिरी : शिवस्मारक पायाभरणीच्या शुभारंभासाठी समुद्रात गेलेली स्पीड बोट उलटून झालेल्या अपघातात खेड तालुक्यातील गुणदे गावातील सिद्धेशचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमीने गुणदे गावावर शोककळा पसरली आहे. सिद्धेश हा व्यवसायाने सीए होता. त्याचे मामा विक्रांत आंब्रे हे शिवसंग्राम संघटनेचे कार्यकर्ते व विनायक मेटे यांचे समर्थक आहेत. त्यांच्यासोबत सिद्धेश या कार्यक्रमाला गेला होता.
बालपण गावीच गेलेला सिद्धेश लहानपणापासून हुशार होता. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर तो मुंबईला गेला. मेहनत घेऊन सीए झालेल्या सिद्धेशचं काही माहिन्यांपूर्वीच लग्न झालं होते. पत्नीसह तो मुंबईतच वास्तव्याला होता. सिद्धेशच्या आईचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं.
सिद्धेशच्या मृत्यूची बातमी समजताच अनेकांनी त्याच्या गावातील घराकडे धाव घेतली.