मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर ): २१ जुलै ते २६ जुलै २०२२ दरम्यान होणाऱ्या १५ व्या वर्ल्ड तायक्वांडो कल्चरल एक्स्पो या आंतरराष्ट्रीय पुमसे आणि क्युरोगी स्पर्धेसाठी मुंबईतील सिद्धकला तायक्वांडो अकादमीतील खेळाडू सज्ज झाले आहेत. साऊथ कोरिया मधील तायक्वांडो वोन , जेलबोक दो , मुज्जू या शहरात या स्पर्धा होणार आहेत. सहा दिवस सुरू राहणाऱ्या या स्पर्धेसाठी सिद्धकला तायक्वांडो अकादमीचा संघ साऊथ कोरिया मध्ये नुकताच दाखल झाला आहे.
या संघात युनिव्हर्सल हाय स्कुलची तनिष्का वेल्हाळ , जानकीदेवी पब्लिक स्कूलचा आरव चव्हाण , आर्या चव्हाण , अवनी चव्हाण , जमणाबाई नरसी स्कूल मधून रियान पटेल , जीवांश चंदोक, हेरिटेज एक्सपरेनटियल लर्निग एंटरनॅशनल स्कूलचे निवेश आलुवालिया आणि सिनियर वयोगटात चंदन परिडा, स्वप्नील शिंदे , विक्रांत देसाई यांचा समावेश असणार आहे. या संघाचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय पंच आणि प्रशिक्षक जयेश वेल्हाळ हे करणार आहेत.या स्पर्धेसाठी गेले ३ ते ४ महिने सिद्धकला तायक्वांडो अकादमीच्या मुंबई विभागातील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षक निशांत शिंदे , यश दळवी , चंदन परिडा, स्वप्नील शिंदे , फ्रँक कनाडीया , कृपेश रनक्षेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचा सराव सुरू होता.