Mumbai : एमएसएमई आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की रोजगार निर्मितीसाठी आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी उत्पादन क्षेत्र अधिक बळकट करण्याची गरज आहे. 16 व्या डॉ. गाडगीळ स्मृती व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील वाणिज्य आणि उद्योग समुदायाला संबोधित करताना ते म्हणाले की, ज्ञानाचे संपत्तीमध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला एकात्मिक पद्धतीने भविष्यासाठी दूरदर्शी योजना बनवावी लागेल.
गडकरी म्हणाले की, प्रतिभावान तरुण कुशल मनुष्यबळ ही देशाची ताकद आहे. आपली आयात कमी करून निर्यात वाढवावी लागेल. उद्योजकांना पाठबळ देण्यासाठी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या भागांसाठी धोरणे आखण्याची गरज आहे असे ते म्हणाले. विकासासाठी उद्योगाचे विकेंद्रीकरण फार महत्वाचे आहे.असे त्यांनी सांगितले.














