
रत्नागिरी : रत्नागिरीतील बारा वाड्यांचे दैवत श्री देव भैरी बुवाचा शिमगोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भैरीच्या पालखीला सोमवारी दुपारी 1 वाजता पोलिस कर्मचार्यांनी शस्त्रसलामी दिली. यानंतर रंगमपंचमीचा रंग खेळण्यासाठी पालखी शहरात रवाना झाली.
कोकणातल्या शिमगोत्सवातला रंगपंचमी हा महत्वाचा दिवस. रंगपंचमीच्या दिवशी रत्नागिरीच्या बारा वाड्यांचं ग्रामदैवत असलेल्या श्री भैरी देवाच्या पालखीला चक्क पोलिस मानवंदना देतात. बंदूकधारी पोलिस एलएलआर बंदुकीच्या सहाय्याने पालखीला मानवंदना देतात. ब्रिटिश काळापासून चालत आलेली हि परंपरा रंगपंचमीला रत्नागिरीत आजही अनुभवायला मिळते. पालखीला मानवंदना देण्याची परंपरा आजही कोकणात कायम आहे. रत्नागिरीतला बारा वाड्यांचा मानकरी श्रीदेव भैरी. पण कोकणात होळी उत्सवाची सांगता होते ती रंगपंचमीच्या सणांने. होळी उत्सवात विविध परंपरा पहायला मिळतात. तशीच पण जरा हटके परंपरा रंगपंचमीच्या दुपारी रत्नागिरीत पहायला मिळते. ही परंपरा आगळी वेगळीच म्हणावी लागेल. रंगपंचमी खेळायला श्री भैैरीची पालखी गावात निघते. त्यावेळी निघणाऱ्या भैरी देवाच्या पालखीला पोलिस सलामी देतात. चार बंदूकधारी पोलिस मानवंदना देण्य़ाची परंपरा ब्रिटिश काळापासून सुरु आहे.















