अलिबाग, दि.10 :-सालाबादप्रमाणे श्री समर्थ सदगुरु रंगनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सव श्री समर्थ सदगरु शंकर महाराज रसाळ जेऊरवासी यांच्या कृपा आशिर्वादाने, समर्थ सद्गुरु पांडुरंग महाराज रसाळ यांच्या मार्गदर्शनाने आणि ह.भ.प. पांडुरंग महाराज थळे व ह.भ.प. श्रीपती महाराज पुशीलकर यांच्या प्रेरणेने तसेच ग्रामस्थ कोप्रोली यांच्या सहकार्याने मिती पौष शुद्ध एकादशी ते चतुर्दशी शके 1946 शुक्रवार, दि. 10 जानेवारी ते रविवार दि. 12 जानेवारी 2025 या कालावधीत श्री समर्थ सदगुरु रंगनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कोप्रोली, ता.पेण येथे उत्सव कार्यक्रम संपन्न होत आहे.
या तीन दिवसीय उत्सव कार्यक्रमात किर्तन, हरिपाठ, भजन, नाट्यकलाकृती अशा विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीक्षेत्र संतभूमी ग्रामस्थ कोप्रोली, पेण यांनी केले आहे.