मुंबई : कुर्ली ग्रामस्थ मंडळ मुंबई ट्रस्टकडून श्री लक्ष्मीरवळनाथ शांतादुर्गा मंदिराचा नववा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. २८ एप्रिल (अक्षय तृतीया) रोजी रत्नागिरी तालुक्यातील कुर्ली येथे वर्धापन दिन साजरा होईल. कुर्ली ग्रामस्थ मंडळाचे कार्यकर्ते त्यासाठी मेहनत घेत आहेत.
मंदिरावरील असलेल्या श्रद्धेमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी हजारो भाविक लक्ष्मीरवळनाथाच्या दर्शनाला हजेरी लावतात. २६ एप्रिल ते २७ एप्रिल दुपारी ४ वाजता जिल्हास्तरीय भजन स्पर्धा, २८ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता गणेश पूजन , सकाळी १० वाजता श्री.सत्यनारायण पूजा, सकाळी ११ वाजता शांतादुर्गा मातेची ओटी भरणे कार्यक्रम ,दुपारी १२.३० नंतर महाप्रसाद, दुपारी ४ नंतर भजन स्पर्धेचा बक्षीस समारंभ , दुपारी ५ वाजता मान्यवरांचा सत्कार, रात्रौ ९ वाजता बुवा रमेश गोवेकर यांचे भजन होणार आहे. भाविकांनी दर्शनासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.