डोंबिवली, (प्रशांत जोशी) : श्री क्षेत्र हरिद्वार येथे रायगड ठाणे जिल्हावासीयांचा भव्यदिव्य राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह व किर्तन महोत्सव सदगुरु वामनबाबा महाराज पायावारी संस्थच्या विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात सहभागी झालेल्या हजारो वारकऱ्यांनी हरिद्वार येथे नगर प्रदक्षिणा केली. प्रदिक्षणेत ग्रंथराज ज्ञानेश्वर महाराजांची मिरवणूक काढण्यात आली.
या सप्ताहाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार देशाच्या कानाकोपऱ्यांतून व्हावा या सदहेतूने दरवर्षी अशा अखंड सप्ताहाचे केले जाते. रायगड ठाणे समितीने याचे आयोजन केले असून या समितीत कार्याध्यक्ष सवश्री ह.भ.प. जयराम महाराज डायरे, सचिव ह.भ.प. अजय पाटील, ह.भ.प. सहसचिव पुंडलिक महाराज फडके, उपाध्यक्ष ह.भ.प. वासुदेव चोरवेकर, ह.भ.प. दशरथकाका, ह.भ.प. रतनचंद्र पाटील, ह.भ.प. धाऊशेठ पाटील, बाळकृष्ण पाटील, बाळाराम मुंबईकर, हरिचंद्र म्हात्रे आणि संतोष केणे आदी सहभागी झाले आहेत.