मुंबई, (दिनेश चिलप मराठे) : जन्मताच माझ्या मुलाला ना ऐकू येत होते ना बोलता येत होते, काय करावे काय नाही हेच काही सुचत नव्हते, आपला मुलगा आता आयुष्यभर असाच मुकबधीर राहणार? त्याच्या जीवनातील अंधार कसा दूर होणार? या यक्ष प्रश्नांनी आमच्या जीवनात एक मोठे वादळ उठले होते. मुलाची वैद्यकीय तपासणी केली असता कानाचे ऑपरेशन आणि मशीन बसवायचा 5 ते 7 लाखांचा खर्च सांगितला गेला.माझे पती संजय यांना महीना 12 हजार रूपये पगार,आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची ! हां खर्च करायचा कसा या प्रश्नाने डोकं बधीर झाले होते. या मोठ्या संकटात आमच्या मदतीला देवदूत च्या रुपात एलिम्को आली.
माझा सहा वर्षीय मुलगा मयांकच्या आयुष्यात आशेचा किरण होऊंन आली ती पीएफसी आणि एलिम्को संस्था.त्यांनी नायर रुग्णालयात मयांक चे अडीच वर्षापूर्वी कानाच्या बाजूस कॉकलीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करुन स्वरयंत्र बसविले. स्पीच थेरपी नंतर मयांक आता सर्वसाधारण मुलां प्रमाणे शाळेत जातो. ऐकू बोलू शकतो.त्याच्या जीवनात आमुलाग्र बदल झालाय.असे भर सभागृहात व्यासपीठावरुन आपले अनुभव हुंदका देत डोळ्यांतून ओघळणारे अश्रु आवरत राजेश्री संजय आंद्रे यांनी कथन केले.त्या समयी व्यास पिठावरील केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरन मंत्री थावरचंद गेहलोत,पॉवर फायनांस कार्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष राजीव वर्मा, एलिम्कोचे अध्यक्ष डी.आर.सरीन यांच्या सह उपस्थित कर्णबधीर दिव्यांगांच्या पालकांचे डोळे पाणावले.
निमित्त होते ते “100 कर्णबधीर” मुलांच्या कानावर कॉक्लीयर इम्प्लांट शस्त्रक्रिया झाल्याने त्यांच्यातील
श्रवणदोष नाहिसा होऊन त्यांच्या जीवनात मधुर स्वरांचे आगमन झाल्याचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी नुकतेच अम्बेसीडर हॉटेल येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रसंगी पॉवर फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड चे अध्यक्ष राजीव शर्मा,एलिम्को चे डी.आर.सरीन यांनी शस्त्रक्रियां करिता 2016 -17 वर्षात झालेला खर्च 630 लाख रूपये झाल्याचे नमूद केले.मयांक आंद्रे, समर्थ साखरे, अस्मिता थोरात, दिव्या गुरव,सब्रिन अहमद चौधरी, नावेद मोहम्मद अवेस खान, एहतेशाम अली सिद्दीकी आदी कर्णबधीर मुलांच्या पालकांनी आपापल्या मुलांच्या जीवनातील संघर्षमय अनुभव कथन केले.
मेजर पवन कुमार दुबे,माहिती प्रसारण खात्याच्या अतिरिक्त महासंचालक अर्पणा शर्मा यांनी अशा ख़ास दिव्यांग मुलांच्या सहकार्यार्थ लोकांनी,समाजाने पुढे यावे अशी विनंती केली.
केंद्रीयमंत्री थावरचंद गेहलोत यांनी एक सामाजिक दायित्व म्हणून देशातील उद्योगपती,दानशुर व्यक्ती आणि संस्थानी आर्थिक सहकार्य करीत केंद्र सरकारच्या या दिव्यांग सहायता मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन केले.
कॉक्लीयर इंप्लांट शस्त्रक्रिया या अलीयावर जंग वाणी आणि भाषा अपंगत्व राष्ट्रीय संस्था(दिव्यांगजन)मुंबई,यांच्या तर्फे करण्यात येते.या शस्त्रक्रिया केंद्र सरकारच्या दिव्यांगजन सबलीकरण विभाग तसेच सामाजिक न्याय आणि सबलीकरण विभागा तर्फे करण्यात येतात.शस्त्रक्रिये नंतरच्या पुनर्विकासाची जबाबदारी ऑडी लॉजिस्ट आणि स्पिच लेंग्वेज पैथोलॉजिस्ट तसेच श्रवणदोष असलेल्यांसाठी विशेष प्रशिक्षित शिक्षकां कडून दिले जात आहे.मुलांना घरी वाणी आणि भाषा शिकविण्या मध्ये तसेच बाह्यभाग म्हणजे प्रोसेसरची निगा काळजी घेण्या साठी पालकांना मार्गदर्शन केले जाते.आपल्या घरातील मुकधीर दिव्यांग मुलांना प्रशिक्षण दयावयाचे असल्यास www.adipcochlearimplant.in या वेब साइड वर प्रत्यक्ष पाहता येऊ शकते असे सांगण्यात आले.