रत्नागिरी (आरकेजी): शेतात महावितरणच्या तुटलेल्या तारेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि दुर्दैवी घटना चिपळूण तालुक्यातील कापरे येथे घडली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. दरम्यान पावसामुळे अनेक ठिकाणी महावितरणच्या विजेच्या तारा तुटला आहेत. अशाच तुटलेल्या तारेचा स्पर्श झाल्याने या शेतक-याचा जागीच मृत्यू झाला आहे. अनंत कदम असं या शेतक-याचं नाव आहे. कदम हे आज सकाळी साडेसात वाजता शेतात नांगरणी करण्यासाठी गेले होते. दोन शेत नागरल्यानंतर ते तिसर्या शेतात नांगर घेवून गेले. कदम यांच्या शेतालगत झाड आहे. झाडाची फांदी तुटून महावितरणच्या विद्युत वाहिनीवर पडली. त्यामुळे विद्युत वाहिनी तुटून ती शेतात पडली होती. त्याचा वीज पुरवठा सुरू होता. दरम्यान याच वेळी तुटलेल्या विद्युत तारेशी त्यांचा स्पर्श झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. महावितरणकडून तातडीची मदत म्हणून कदम यांच्या नातेवाईकांना 20 हजाराचा धनादेश देण्यात आला आहे.